Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

महापुरुष जयंतीच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी !

 २७ मिनिटांच्या कार्यक्रमांसाठी लाखो रुपयांची खैरात !


कार्यक्रम अर्धवट संपवला ! पाहायला आलेल्या लोकांची निराशा !

| सांगावा न्यूज | पिंपरी, दिनांक : ११ : क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती दर वर्षी पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयोजित करीत असते. यंदाही ११ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान शिवराय,फुले,शाहू आंबेडकर विचारधारेला अनुसरून भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे. परंतु आज पासून सुरू झेलेल्या या कार्यक्रमांमध्ये दुपार नंतर 'गुलामीच्या उतरंडी' हे नाटक ३.३० वाजता सुरू होणार होते, परंतु महापालिकेच्या कार्यक्रम व्यवस्थापन समिती च्या ढिसाळ नियोजनामुळे हे नाटक सायंकाळी ४.३० वाजता सुरू झाले.  आणि सदर नाटकातील कलाकारांना त्यांचा विषय आणि आशय व्यवस्थित मांडू सुद्धा दिला नाही असे प्रत्यक्ष चित्र उपस्थित प्रेक्षकांनी अनुभवले. नाटक सुरू झाले आणि लगेच काही मिनिटात शेवट करून संपवले. त्यामुळे उपस्थित प्रेक्षक व अनुयायांना विषयाची लिंक लागण्या अगोदरच सदर नाटक आटोपते घेतले. यावरून येथील आयोजन आणि व्यवस्थापन किती ढिसाळ आहे हे निदर्शनास आले. बहुपात्री नाटक हे कमीत कमी दोन तासांचे दोन अंकात संपवावे असा सध्याचा संकेत आहे. परंतु लोकांना नाटक नीटसे पाहू दिले नाही असा थेट सवाल उपस्थित अनुयायी आणि प्रेक्षक करीत आहेत. यावरून असे लक्षात येते की काही मिनिटांसाठी दाखवलेले नाटक आणि अशा आटोपत्या कार्यक्रमांसाठी, महापुरुष जयंतीच्या नावाखाली पैशांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका उधळपट्टी करीत आहे व करदाते व प्रेक्षकांची दिशाभूल केली जात आहे असे निदर्शनास येत आहे. अशी ही दिशाभूल आणि लोकांच्या पैशांची उधळपट्टी होऊ नये. लोकांना कार्यक्रम पूर्ण पहायला मिळावा अशी प्रेक्षांची रास्त मागणी असून जयंती उत्सव कार्यक्रमात अनाठायी होत असलेली उधळपट्टी याची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी लोकांची मागणी आहे.

क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पिंपरी चिंचवड महानगर पालिककेच्या वतीने ११ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमात आज ११ तारखेला झालेल्या दुपार पर्यंतच्या सर्व कार्यक्रमांना ७०% खुर्च्या रिकाम्या होत्या असे चित्र देखील निदर्शनास आले. यावरून असे समजते की महापालिका व्यवस्थापनाने जयंती उत्सव कार्यक्रमाचा व कार्यक्रमांच्या वेळापत्रकाचा, कार्यक्रमांच्या आशय आणि विषयांचा योग्य प्रसार आणि प्रचार केलेला नाही.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा