| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ११ : "लिंब्या" चित्रपटाचा भव्य पोस्टर प्रकाशन सोहळा दिनांक १० एप्रिल रोजी पिंपरी येथे संपन्न झाला. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती ताई देसाई, मा. नगरसेवक राहुल दादा कलाटे , उद्योगपती राहुल ओव्हाळ, आणि अभिनेता अमोल देवण यांच्यासह सिनेमातील कलाकार तंत्रज्ञ व मान्यवर उपस्थित होते.
सिनेमाचे दिग्दर्शक शंकर पटेकर हे असून नितीन वेताळ यांनी सिनेमा लिहिला आहे. अनिता अगरवाल (शिवमनी फिल्म प्रोडक्शन) प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट लिंब्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. आर्या घारे, रोहित रणसिंगे, नितीन साळुंखे, प्राची पटेकर, राजू गोसावी, अशोक कानाके, बाळासाहेब काटे, केतकी पायगुडे, वैशाली जगताप, योगिता शिंदे, कोमल मोरे, मनिषा पुणेकर, रॉयल विक्रांत, सचिन (बादशाह), रामभाऊ, सिद्धू, साजन, बिबन, बिट्टू, साजन शिंदे, व्यंकट राऊत. दिलीप डाके यांनी या सिनेमात भूमिका केल्या आहेत.
"लिंब्या" हा एक सामाजिक संदेश देणारा चित्रपट असून, त्यातून ग्रामीण जीवनातील वास्तव, संघर्ष आणि मानवी नातेसंबंध यांची हृदयस्पर्शी मांडणी करण्यात आली असल्याचे उपस्थित कलाकारांनी सांगितले. याप्रसंगी
चित्रपटाचे संगीत, अभिनय आणि कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा