Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २४ एप्रिल, २०२५

माऊली उर्फ किसन रामा भोसले त्यांचा वाढदिवस स्नेहछाया अनाथ आश्रमात संपन्न

 

| सांगावा | दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी स्नेहछाया परिवार दिघी येथील वंचित,उपेक्षित व स्थलांतरित लेकरांच्या कल्याणार्थ पिंपरी चिंचवड स्थित पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आदरणीय माऊली उर्फ किसन रामा भोसले यांनी त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत येथील बालगोपाळांना शैक्षणिक साहित्य भेट देत व अन्नदान करून साजरा केला.

यावेळी त्यांच्या सोबत आदिवासी पारधी विकास सुरक्षा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी माऊली भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सोबतच स्नेहछाया परिवारातील बालगोपालांनी त्यांचे हसतमुखाने व टाळ्या वाजवून आनंदाने स्वागत केले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्नेहछाया प्रकल्पाचे संचालक प्रा. दत्तात्रय इंगळे यांनी माऊली भोसले यांच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व माऊली भोसलेंसारखे समाजातील दानशूर व्यक्तिनी पुढे येऊन त्यांचे वाढदिवस व लग्नाचे वाढदिवस  विविध गरजू संस्थांमध्ये साजरी करून तेथील वंचित व गरजु लेकराना शक्य तसे  अन्नदान व ज्ञानदान स्वरूपामध्ये मदत करावी असे आव्हाहन देखील केले . माऊली भोसले हे दरवर्षी त्यांचा वाढदिवस अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रमात साजरा करत असतात. त्याचाच भाग म्हणून त्यांनी स्नेहछाया परिवारामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला.

या वेळी शंभू कांबळे, नामदेव काळे, श्रीमंत भोसले, अनिल पवार, दिपाली,भोसले, शुभम शिंदे, आदित्य काळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा