Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

भगवान परशुराम जयंतीचा उत्सव भोसरीत उत्साहात साजरा

वेदमूर्ती महेश कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, नागेश वैद्य यांनी मंत्रघोषाद्वारे संपूर्ण वातावरण धार्मिक केले

| सांगावा न्यूज | भोसरी (प्रतिनिधी) दि.२९ एप्रिल २०२५ :– जय परशुराम सेवा संघ समितीच्या वतीने भोसरीतील भगत वस्ती येथे भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवयोगी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्री भगवान परशुराम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. वेदमूर्ती महेश कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, नागेश वैद्य यांनी मंत्रघोषाद्वारे संपूर्ण वातावरण धार्मिकतेने भारून टाकले. उपस्थित नागरिकांच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये श्री माधव तिखे गुरुजी (ग्रामउपाध्यक्ष, भोसरी गाव), शशिकांत कुलकर्णी गुरुजी, महेश जोशी गुरुजी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रविण कुरबेट, हनुमंत रामदासी, दीपक भास्कर, रोहित वैद्य, संदीप वैद्य, संदीप कुलकर्णी, तात्यासाहेब कुलकर्णी, शेंडे गुरुजी, चिन्मय पाठक, प्रकाश कुलकर्णी, शिवाजी डांगे, सिद्धांत चौधरी यांचा समावेश होता.

कार्यक्रमात महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. ज्योतिर्भास्कराचार्या सौ. मंजुषा जोशी, विजयालक्ष्मी डांगे, ज्योती कुलकर्णी, धनश्री कुलकर्णी, स्नेहल कुलकर्णी, सीमा कुलकर्णी व इतर अनेक महिला भगिनी या वेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय परशुराम सेवा समितीचे सर्व सदस्य व सभासदांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्योतिषाचार्य महेश जोशी यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा