Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ३० एप्रिल, २०२५

१२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार समाजाच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा जंगी स्वागत

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार विलास लांडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गौरव रथयात्रा भोसरी येथे दाखल 


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ३० : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महाराष्ट्र गौरव रथ यात्रा आज पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही गौरव रथ यात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली. यावेळी महाराष्ट्रातील १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार समाजाच्या प्रमुख उपस्थितीत गौरव रथयात्रेचा जंगी स्वागत करण्यात आला आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी नदीच्या जलाने गौरव कलश रथाचे पूजन करण्यात आलं आहे. यावेळी १२ बलुतेदार आणि १८ अलुतेदार समाजांनी त्यांच्या पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवला आहे त्याचबरोबर मलखांब आणि मर्दानी खेळाच प्रात्यक्षिक दाखवून महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आला आहे. दापोडी मार्गे गौरव कलश रथयात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली आहे त्यानंतर लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकासमोर या यात्रेचे जंगी स्वागत करत गौरव कलश नद्यांच्या जल आणि पूजन करण्यात आला आहे. त्यानंतरची यात्रा पिंपरी मार्गे काळेवाडी आणि काळेवाडीकडून भक्ती सारखे शक्ति मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे. यार यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून उद्या यात्रेचा समारोप मुंबई येथे होणार आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा