Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २० मे, २०२५

२१ मे पासून भूम - पुणे, पिंपरी चिंचवड एसटी बस अधिकृत मार्गावरूनच जाताना आणि येताना मार्गक्रमण करण्याचे वरिष्ट अधिकाऱ्यांचे लेखी आदेश

पूर्वीप्रमाणे औंध मार्गे - काळेवाडी फाटा - डांगे चौक चिंचवड - अजिंठानगर याच अधिकृत मार्गावरून जाईल एसटी बस 

अधिकृत मार्गाचे पालन न करणाऱ्या आवाहक व चालकांवर होणार कारवाई !

प्रवाशांच्या समस्येला वाचा फोडून सतत बातमीचा पाठपुरावा केल्यामुळे सांगावा न्यूजचा सकारात्मक परीणाम : प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण 

| सांगावा न्यूज | भूम, दिनांक २० : भूम परांडा वाशी तालुक्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दिनांक २१ मे पासून भूम - पुणे, पिंपरी चिंचवड एसटी बस अधिकृत मार्गावरूनच जाताना आणि येताना मार्गक्रमण करतील असे आदेश भूम डेपो मॅनेजर यांनी वाहक आणि चालकांना दिले आहेत. 
भूम डेपोच्या एसटी बसेस पुणे शहरात आल्यानंतर पिंपरी चिंचवड कडे प्रस्थान करताना आता पूर्वीप्रमाणे औंध मार्गे काळेवाडी - फाटा डांगे - चौक - चिंचवड - अजिंठानगर या मार्गावरून जाऊन शेवटचा स्टॉप अजिंठानगर करून मुक्कामी वल्हभनगर येथे येतील. गेली तीन वर्षानंतर सदर रूट पुन्हा सुरू होत असल्यामुळे भूम परांडा वाशी तालुक्यातील प्रवाशांसह पुणे पिंपरी चिंचवड येथील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेली तीन वर्षांपासून सदर रूट मार्ग वाहतुकीसाठी चालू असताना देखील वाहक आणि चालक यांनी चुकीची कारणे सांगत वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून शॉर्ट कट मारीत होते. त्यामुळे प्रवाशांना अधिकृत मार्गावर न सोडता चुकीच्या मार्गावर सोडून प्रवाशांची हेळसांड करीत होते. शिवाजी नगर आणि स्वारगेट ला आलेली एसटी बस शॉर्ट कट मारून खडकी दापोडी मार्गे थेट वल्हभनगरला जात होती, जो बसचा अधिकृत मार्ग नव्हता. तरीदेखील गेली तीन वर्ष सदर शॉर्ट कट चालू होता. अशा रिनीने प्रवाशांना त्रास देणे चालू होते.

साप्ताहिक सांगावा न्यूज पेपरच्या माध्यमातून वारंवार बातम्या देऊन संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले की वाहक चालक वरिष्ठांना चुकीची माहिती देऊन रस्ता बंद असल्याचे खोटी कारणे सांगून कामचुकारपना करीत होते. सदर रूट वाहतुकीसाठी चालू आहे. तसे व्हिडिओ स्वरूपात आणि फोटो स्वरूपात पुरावे देऊन सांगावा न्यूज संपादक विनय सोनवणे यांनी वेळोवेळी सिद्ध केले होते. या बातमीची दखल घेऊन धाराशिवाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील कार्यकर्ते भगवन बांगर यांच्या मार्फत लेखी पत्र देऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्याच अधिकृत मार्गावर जाताना आणि येताना बस मार्गक्रमित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच वारंवार वाहक चालकाची चलाखी आणि कामचुकारपना सढळ पुराव्यानिशी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील बस प्रवाशांच्या सोयीनुसार अधिकृत रूटवर येत नव्हती. शेवटी दिनांक २० मे रोजी सांगावा न्यूजचे संपादक यांनी भूम येथे जाऊन डेपो मॅनेजर यांना पुराव्यानिशी लेखी तक्रार करून विनंती केली. याची दखल घेऊन खात्री पटल्यानंतर भूम डेपो मॅनेजर श्रीकांत सुरवसे यांनी लेखी आदेश काढून भूम - पुणे, पिंपरी चिंचवड बस ही दिनांक २१ मे २०२५ पासून औंध मार्गे काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड - अजिंठानगर याच मार्गावरून जाईल आणि याच मार्गावरून येईल अशा सूचना वाहक आणि चालकांना दिल्या आहेत. 


या अधिकृत मार्गावरून बस मार्गक्रमित करणे हे आता वाहक आणि चालकांना बंधनकारक आहे. जे वाहक आणि चालक या रूट चे पालन करनार नाहीत त्यांच्यावर रा.प.कायद्यानुसार कडक करवाई करण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्याने लेखी आदेशात दिले आहेत. प्रवाशांना आवाहन आहे की जे कोणी वाहक चालक या मार्गाने जाणार नाहीत त्यांना डेपो मॅनेजरचे लेखी पत्र वजा आदेश या बातमीत दाखवले आहेत ते त्यांना दाखवा. आणि जर या मार्गाचे पालन नाही केले तर तशी तक्रार संबंधित वाहक आणि चालकाच्या नावाने भूम डेपो मॅनेजर व धाराशिव डी सी ऑफिसरकडे करावी. या विधायक कामासाठी आणि प्रवाशांच्या सोईसाठी सांगावा न्यूज परिवारातील पत्रकार आपल्याला सहकार्य करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा