Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २२ मे, २०२५

भिगवण येथील शेतकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन जाहीर माफी ! ___ मारुती भापकर

 

| सांगावा न्यूज | भिगवण, शुक्रवार दि.१६/०५/२०२५ उजनी येथील शेतकरी,मच्छिमार व भिगवण,इंदापूर व इतर अनेक गावांना ज्या नरक यातना भोगावे लागतात. त्याबाबत पाहणी करण्याकरता आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह व पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील पर्यावरण क्षेत्रात काम करणारे सक्रिय कार्यकर्ते भिगवन येथे येऊन येथील तलावाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर भिगवण येथे दुर्गा मंदिरात शेतकऱ्यांची जनजागृती बैठक घेण्यात आली. भिगवन इंदापूर येथील शेतकरी मच्छिमार यामध्ये सहभागी झाले होते. डॉक्टर राजेंद्र सिंह व इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. श्री सिंह यांनी या गंभीर ज्वलंत विषयासंदर्भात अनमोल असे मार्गदर्शन केले. व पुढील दिशा स्पष्ट केली. यावेळी बोलतांना पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी आपल्या मनोगतता येथील जनतेची जाहीर माफी मागितली कारण, आपण पुणे पिंपरी चिंचवड शहरात राहणारे लोकं आणि काही कंपन्याचे मालक नदी प्रदूषण रोखण्यात कमी पडत आहोत. 

" या कार्यक्रमांमध्ये मलाही सहभागी होता आले. माझा हि सन्मान झाला. यावेळी मी शेतकऱ्यांसमोर बोलताना पवना इंद्रायणी मुळा मुठा प्रदूषित होण्याचे पाप आमचेच आहे. आम्ही आपले गुन्हेगार असून आमच्याकडून झालेल्या पापा बद्दल व गंभीर चुकांबाबत आम्ही आपल्या चरणी नतमस्तक होऊन जाहीर माफी मागत आहोत. या पुढच्या काळात पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडे शहरवासीयांकडून नद्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्याबाबत आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, यासाठी महापालिका, पर्यावरण विभाग, एमआयडीसी पीएमआरडी व महाराष्ट्र शासन यांच्याकडे आपण सगळे या विषयाबाबत एकत्रित येऊन लढू व जिंकू असे स्पष्ट मत मी मांडले. भिगवनचे समस्त ग्रामस्थ व पर्यावरण वादी कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार"

पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरातून जाणारया मुळा, मुठा, पवना,इंद्रायणी या नद्या भीमा नदीला जाऊन मिळतात. पुणे व पिंपरी चिंचवड मधून जाणाऱ्या नद्यांमध्ये मेला मिश्रित पाणी, एमआयडीसीचे केमिकल युक्त पाणी, विविध रासायनिक पदार्थ व प्लास्टिक या नद्यांमधून भीमा नदीत जाते.पुढे हेच पाणी उजनी धरणामध्ये अडवून या विभागातील शेतकरयांना पिण्यासाठी व शेतीसाठी वितरित केले जाते. तसेच हेच पाणी श्री क्षेत्र पंढरपुर येथे पवित्र चंद्रभागा नदीद्वारे जाते. ज्या विठुरायाच्या पंढरपुरात देशभरातून व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी मोठ्या भक्ती भावाने येतात. चंद्रभागेचं स्नान करतात, हे पवित्र जल अमृत म्हणून घरी येऊन जातात.तसेच उजनी धरण व भीमा चंद्रभागा नद्यांवर अवलंबून असणारे शेतकरी मच्छीमार व सामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे तसेच विविध त्वचारोग, पोटाचे विकार, कॅन्सर सारखे भयंकर आजार शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा