Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २३ मे, २०२५

पालिकेच्या हलगर्जी मुळे दगावले चार निष्पाप श्वान

कामगार नगर पिपंरी येथे महानगर पालिकाच्या विद्युत पोल मधून विजेचा धक्का लागून चार कुत्री ( श्वान) मरण पावली 

श्वान मृत्युस जबाबदार असलेल्या सबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

| सांगावा न्यूज| कामगार नगर पिंपरी येथे 19/5/25 रोजी महानगरपालिका विद्युत विभाग कार्यकारी अभियंता व सबंधित ठेकेदार प्रवीण इलेक्ट्रिक प्रो सुर्यवंशी व सब ठेकेदार राज सलगर यांच्या हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर करणे फक्त मलई वर ताव मारणेच्या गंभीर प्रकारा मुळे इलेक्ट्रिक स्ट्रीट पोल ची विद्युत् प्रवाह केबल (सडलेली) खुली ठेवल्याने 4 भटकी कुत्री (श्वान) त्या पोल जवळ गेली व  विद्युत प्रवाहाच्या जोरदार धक्क्याने त्या निष्पाप निरागस प्राण्यांचा दुर्दैवी अंत झाला. सदर इलेक्ट्रिक स्ट्रीट पोल ठिकाणी रामकृष्ण अपार्टमेंट सोसायटी आहे जर या सोसायटीतील रहिवासी किंवा पादचारी पावसाचे पाणी व त्या इलेक्ट्रिक पोल च्या संपर्कात आले असते तर मोठी जीवित हानी झाली असती. 
म्हणून ,जबाबदार महानगरपालिका  विद्युत विभाग कार्यकारी अभियंता व सबंधित ठेकेदार प्रवीण इलेक्ट्रिक प्रो .सुर्यवंशी व सब ठेकेदार राज सलगर यांवर 4 निष्पाप निरागस प्राण्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेने संबंधितावर सदोष प्राणी वधाचा गुन्हा दाखल करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत सचिन जाधव,सौ. किरण जाधव, सतीश अडगळे, शेराज अन्सारी, मदन शर्मा, गणेश शिंदे या प्राणीमात्रांनी मा, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय,पिंपरी पोलीस स्टेशन ला तक्रार अर्ज दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा