![]() |
| नृत्य कला सादर करताना कलाकार |
![]() |
| उद्घाटन प्रसंगी डावीकडून तमन्ना नायर, विजया काळे आणि रत्ना वाघ आदी मान्यवर |
| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक २५ : अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आणि युनिस्को यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा राष्ट्रीय भारताची प्रतिष्ठा महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, शिवाजीनगर या ठिकाणी प्रसिध्द भरतनाट्यम् नृत्यांगना तमन्ना नायर, जेष्ठ नाट्य समिक्षक विजया काळे, अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी हेमंत वाघ, स्नेहा पेठकर, संजय भुजबळ, हृषीकेश थेटे हे मान्यवर उपस्थित होते.
या महोत्सवात भारतातील १८ राज्यातून ४००० कलाकार सहभागी झाले असून भारतीय शास्त्रीय नृत्य यात भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी, मणिपुरी, कथकली, ओडिसी तसेच हिंदुस्थानी कर्नाटकी गायन तसेच अनेक प्रकारचे वाद्य वादन असे एकूण एक हजार चारशे कलांचे सादरीकरण होणार आहेत. महोत्सवात सहभाग घेतलेल्या स्पर्धकांच्या कला गुणांचे निरीक्षण व सांस्कृतिक नृत्य, संगीत, सुर, ताल, राग, भाव अशा विविध प्रकारच्या अंगीकृत भूमिका असणाऱ्या स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा मोठ्या उत्साहात १ जून रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन शिवाजीनगर येथे दुपारी १.०० वा. पार पडणार आहे.
२४ मे ते १ जून रोजी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत कला प्रेमी रसिकांना हा महोत्सव विनामूल्य पाहता येणार आहे. अशी माहिती संयोजक हेमंत वाघ यांनी केले आहे.
भारताच्या कानाकोऱ्यातून कलाकारांचा सहभाग
गुजरात येथील कच्छ, राजस्थान बॉर्डर वरील अनेक कलाकार या राष्ट्रीय कला महोत्सवात आवर्जून सहभागी झाले आहेत. तसेच महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओडिशा, प. बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, केरळ, गोवा, तेलंगणा, दिल्ली, आसाम आदी राज्यातून कलाकारांचा सहभाग घेतला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा