Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शनिवार, २१ जून, २०२५

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये योग दिन उत्साहात साजरा


| सांगावा न्यूज | पिंपरी, २१ जून २०२५ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहरातील सर्वच १३४ शाळांमध्ये योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळांमध्ये योगासने व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्यसाधून महापालिकेच्या शाळांमध्ये ‘एक माता एक झाड’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक,योग प्रशिक्षक, शिक्षकेतर वर्ग, सुरक्षारक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

योग संगम’ कार्यक्रमामध्ये सर्वच शाळांनी घेतला सहभाग 

आयुष मंत्रालयाच्या ‘योग संगम’ कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या सर्व शाळांनी सहभाग नोंदवला. सहभागी शाळांना ऑनलाइन स्वरुपामध्ये आयुष मंत्रालयाकडून ‘योग संगम प्रमाणपत्र’ प्राप्त झाले.  

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या सर्वच १३४ शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी योगासने करुन योग दिन साजरा केला. योग दिनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रागंणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत रुची वाढविण्यासाठी योग दिनाचे महत्वाचे योगदान आहे.

____शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रमाणेच येत्या वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचा महापालिकेचे नियोजन आहे. आजचा उपक्रम हा विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजून देऊन त्यांच्या दैंनदिन व्यवहारामध्ये योगाबाबत जागरुकता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल.

____प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरुकता व योगाचे महत्व समजावे, यासाठी प्रत्येक शाळेमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनाच्या व्यतिरिक्तसुध्दा शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना योग, योगासने याबाबत माहिती देण्याचा व त्यांना त्यामध्ये सहभागी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. 

_____तानाजी नरळे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा