या गोर गरीब सिलिंधारक शेतकऱ्यांच्या जमिनी भू माफिया लुटताहेत ! पोलिस आणि सबंधित प्रशासन काय करतंय !
गोरगरिबांच्या आणि sc st लोकांच्या जमिनी लाटण्याचा प्रकार! तरीही प्रशासन मूग गिळून गप्प !
| सांगावा | भूम, दिनांक १९ : भूम तालुक्यातील मौजे डुक्करवाडी येथे भूमिहीन गरिब लोकांना sc st लोकांना आणि माजी सैनिकांना १९९७ साली सीलिंग कायद्यांतर्गत जमिनी मिळाल्या होत्या. आजतागायत सिलिंगधारक शेतकरी त्या जमिनीवर उदरनिर्वाह करीत होते. परंतु मध्यंतरी कोरोना काळात लॉकडाउन मध्ये सिलिंगधारक शेतकरी घरच्या बाहेर निघाले नाहीत, शेतात आले नाहीत याचा फायदा घेऊन शेजारच्या गुंड प्रवृत्तीच्या शेतकऱ्यांनी सिंलिंगधारक गोर गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या आमच्याच जमिनी आहेत असा कांगावा करून सिलिंगधारक शेतकऱ्यांना तिथे येण्यास मज्जाव करू लागले. दमदाटी करून sc st लोकांच्या तसेच गरीब शेतकऱ्यांच्या आणि माजी सैनिकांच्या जमिनी लॉकडाउन पासून भूमाफिया घुले टोळी ओरबाडून खात आहेत. गेली पाच वर्षापासून पोलिस, तहसील आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून घडत असलेला प्रकार वेळोवेळी निदर्शनास आणून दिला असून प्रशासनाने योग्य ती पावले उचलली नसल्यामुळे गोर गरीब शेतकऱ्यांना, sc st शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मालमत्तेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सिलिंगधारक शेतकऱ्यांच्या हद्दी सीमा नष्ट केल्या असून नैसर्गिक नदीप्रवाह घुले टोळीने बुजवले आहेत. भू माफिया घुले टोळी वर आत्तापर्यंत प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे होती पण संबंधित प्रशासन अधिकारी आणि कर्मचारी यांनी घुले टोळी सोबत साटे लोटे करून आर्थिक देवाणघेवाण केल्यामुळे सबंधित कारवाई झाली नसल्याचा दावा सिलिंगधारक शेतकऱ्यांनी केला आहे.
भूम तालुक्यातील सोनगिरी, भोनगिरी, चिंचोली, सुकटा, घटनांदुर, घाट पिंपरी, भूम आणि आसपासच्या गावातील भूमिहीन शेतकऱ्यांना सीलिंग कायद्या अंतर्गत जमिनी मिळाल्या होत्या. परंतु नंतरच्या कळतात घुले टोळीने सिलिंगधारक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा उद्देशनर शेजारच्या इतर शेतकऱ्यांच्या जमिनी नाममात्र पड्या भावने खरेदी. त्यांच्या खरेदीच्या जमिनी सोडून भूमाफिया घुले टोळीने सिलिंगधारक शेतकऱ्यांच्याच जमिनी लाटून मालक असलेल्या सिलिंगधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात येण्यापासून मज्जाव करू लागले. सदर प्रकार २०२० पासून आजतागायत चालू आहे. अनेक वेळा भू माफिया घुले टोळीतील कुटुंबाने संघटितपणे सिलिंगधारक sc st लोकांच्या जमिनीवर कब्जा केला असून अनेक वेळा त्यांना मारायच्या उद्देशाने हल्ले केले आहेत. सिलिंगधारक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या पीक उगवून आले की, घुले टोळी त्या पिकात जनावरे घालून उभे पिक नष्ट करतात. असे का केले अशी विचारणा केली की सशस्त्र अंगावर धावून येतात. त्यामुळे शिलिंगधारक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, आम्हाला आमच्या जमिनी कसायला परत मिळाल्या नाहीत तर आम्ही संघटितपणे आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यामध्ये जास्तीत जास्त संख्येमध्ये sc आणि st लोकांच्या जमिनी भू माफिया घुले टोळीने हडप केल्या असून sc, st आयोगाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन संघटितपणे लोकांच्या जमिनी बळकावून गुन्हेगारी करणाऱ्या संबंधित घुले टोळीवर कडक कारवाई करून सिलिंगधारक शेतकऱ्यांना न्याय द्यावा. आणि पोलिस संरक्षणात सिलिंगधारक शेतकऱ्यांच्या हद्दी सीमा ज्या भू माफिया टोळीने नष्ट केल्या होत्या त्या पूर्ववत करून शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या जमिनी कसून उदरनिर्वाह करता येईल असे सुरक्षित वातावरण तयार करावे अशी विनंती सिलिंगधरा sc, st शेतकऱ्यांनी sc आणि st आयोगाकडे केली आहे.
" आमच्या शेतावर अतिक्रमण करून आम्हाला दमदाटी करून मारहाण करणारे आणि नैसर्गिक नदी ओढे प्रवाह बुजवणारे, अनधिकृत पणे डोंगर पोखरणारे विशेषतः SC, ST लोकांच्या जमिनी बळकावून त्यांच्या प्रॉपर्टीची नासधूस करणारे घुले कुटुंबातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :-
तुळशीराम घुले, अप्पा घुले, सुब्राव घुले, खंडू अप्पा घुले, रामदास घुले, मनोहर घुले, शिवाजी घुले, बालुबाई रामा घुले, म्हाल्हारी घुले, बाळू घुले, खंडेराव घुले, परमेश्वर घुले, रामदास घुले आणि त्यांचे शिक्षण घेत असलेली मुले मुली जे अठराव वर्षाच्या वरील आहेत मुलांची नावे माहित नाहीत ते देखील हे सर्व आरोपी आहेत यांनी मिळून संघटितपणे सिलिंगधारक sc st शेतकरी, माजी सैनिक शेतकरी आणि गोर गरीब सिंलिंगधारक शेतकऱ्यांचा जमिनी बळकावल्या आहेत. सबंधित भू माफिया घुले टोळीवर पोलिस, तहसीलदार, कलेक्टर यांनी तत्काळ कारवाई करून सिलिंगधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे पुन्हा पोलिस संरक्षणात मोजणी करून सिलिंगधारक शेतकऱ्यांजमिनी कसून उदरनिर्वाह करता येईल असे वातावरण निर्माण करून द्यावे. तसेच सध्या मूळ मालक असलेले ज्यांच्या जमिनी सिलिंगधारक शेतकऱ्यांना मिळाल्या आहेत त्या जमिनीपासून त्यांना वंचित ठेवण्याचे कटकारस्थान देखील सुरू आहे अशा पूर्वीच्या माजी मूळ मालकांवर देखील कारवाई करावी अशी संबंधित प्रशासन आणि sc st आयोगाला विनंती आहे" ____ ( सिलिंगधारक शेतकरी )

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा