| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक १५ : शहरातील शून्य ते १४ वयोगटातील मुला मुलींसाठी "सुवर्णप्राशन" डोस दिला जाणारा असून तशी सवलतीच्या दरात लाभ घेण्याची संधी माजी नगरसेविका सौ. सरिता साने यांनी उपलब्ध करून दिली आहे. सरिता साने सोशल फाउंडेशन व वेदस्पर्श यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. दिनांक १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान "सुवर्णप्राशन" डोस चालू राहणार आहे. पहिला डोस सवलतीच्या दरात असेल. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सौ. सरिता साने यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा