Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

संपूर्ण खानदेश समाज गणेश कस्पटे यांच्या पाठीशी

स्नेहमेळाव्यातून व्यक्त झाला विश्वास; भाजप उमेदवारीच्या चर्चेला बळ


| सांगावा न्यूज | वाकड, दिनांक २६ डिसेंबर : प्रभाग क्रमांक २६ मध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार गणेश कस्पटे यांच्याबद्दल नागरिकांचा वाढता विश्वास अधिक दृढ होत असतानाच, आता संपूर्ण खानदेश समाजही कस्पटे यांच्या पाठीशी ठाम उभा असल्याची भावना उघडपणे व्यक्त होत आहे. नुकताच आयोजित करण्यात आलेल्या खानदेश समाज बांधवांच्या भव्य स्नेहमेळाव्यातून हा विश्वास स्पष्टपणे दिसून आला.

या स्नेहमेळाव्यास प्रभागातील विविध भागांतून मोठ्या संख्येने खानदेशी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी अनेक ज्येष्ठ, युवक व महिला बांधवांनी आपापल्या भावना व्यक्त करताना, “गणेश कस्पटे आणि त्यांच्या पत्नी सारिका कस्पटे हे केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता, कायम समाजासाठी धावून येणारे कुटुंब आहे. सुख-दुःखात, अडचणीच्या वेळी ते आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहतात,” असे मत व्यक्त केले.

समाज बांधवांनी पुढे सांगितले की, सामाजिक उपक्रम, मदतकार्य, सण-उत्सव, आरोग्य शिबिरे, अडचणीतील कुटुंबांना आधार अशा अनेक प्रसंगी कस्पटे दाम्पत्याने कोणताही भेदभाव न करता मदतीचा हात दिला.
“त्यामुळे खानदेश समाज कायम त्यांचा ऋणी आहे आणि येणाऱ्या काळात प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण गणेश कस्पटे यांच्या पाठीशी ठाम उभे राहू,” अशी ठाम भूमिका अनेकांनी मांडली.

या वेळी उपस्थितांना संबोधित करताना गणेश कस्पटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी आजपर्यंत जे काही कार्य केले आहे, ते केवळ माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून केले आहे. आपण सर्व बांधवांनी मला आपलंसं मानून स्वीकारलं, प्रेम दिलं, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं समाधान आणि आनंद आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

प्रभाग क्रमांक २६ मध्ये आधीच नागरिकांचा विश्वास, सामाजिक कार्यातून उभे राहिलेले नेतृत्व आणि आता खानदेश समाजाचा जाहीर पाठिंबा यामुळे गणेश कस्पटे यांचे राजकीय वजन अधिक वाढताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर, भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आणखी बळावली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पद नसतानाही सातत्याने काम करणारा नेता, पद मिळाल्यावर किती मोठा बदल घडवू शकतो, याचा विश्वास आता प्रभाग २६ मधील विविध समाजघटकांमध्ये अधिक ठामपणे निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा