| सांगावा न्यूज | वाकड येथील बर्ड व्हॅली बँक्वेट हॉलमध्ये प्रभाग क्रमांक २६ मधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास सोसायटी प्रतिनिधी, नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उमेदवार गणेश सयाजी कस्पटे व सारिका गणेश कस्पटे यांना उपस्थित सोसायटीवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एरोस मिडोज, माउंट वर्ड, पारस विस्टा, मालपाणी ग्रीन्स, ड्रीम कॅसल ,पार्क वेज, अतुल पॅरेडाईझ , डायनस्टी, pristin woods यांसह परिसरातील अनेक नामांकित सोसायट्यांचे पदाधिकारी व सदस्य या मेळाव्यास उपस्थित होते. नागरिकांनी परिसरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, स्वच्छता, सुरक्षा तसेच सोसायट्यांशी संबंधित विविध प्रश्न व अपेक्षा मांडल्या.
यावेळी बोलताना गणेश कस्पटे यांनी प्रभागातील विकासकामांचा आढावा घेत भविष्यातील नियोजन मांडले. “वाकड परिसराचा सर्वांगीण विकास, सोसायट्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवणे आणि नागरिकांना पारदर्शक, जबाबदार प्रशासन देणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी नमूद केले. सारिका कस्पटे यांनीही महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांसाठी स्वतंत्र उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.
मेळाव्यातील नागरिकांनी कस्पटे दाम्पत्याच्या भूमिकेचे स्वागत करत त्यांना पाठिंबा दर्शविला. या मेळाव्यामुळे प्रभाग क्रमांक २६ मधील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश कस्पटे व सारीका कस्पटे या दाम्पत्याची ताकद वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा