राहुल कलाटेंनी घेतले कमळ हाती
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २३ : आज मंडळावर दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत राहुल कलाटे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत राहुल कलाटे यांना भाजपमध्ये जाहीर प्रवेश दिला गेला. यावेळी " राहुल कलाटे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है " अशा कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन आनंद व्यक्त केला. परंतु वाकड मधील स्थानिक भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदे घेऊन राहुल कलाटे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला होता यांच्या भावनांचे काय ? तर दुखावले गेले आहेत की कलाटे यांच्यासोबत त्यांना आता जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही याचे पडसात येत्या निवडणुकीत दिसून येतील.
शहरातील राजकीय पटलावरील एक मोठ नाव राहुल कलाटे यांनी आज भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षाची ताकद नक्कीच वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. असे असले तरी कलाटें च्या भाजप मध्ये प्रवेशाला वाकड येथील स्थानिक भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध होता. राम वाकडकर, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, विशाल आप्पा कलाटे, नवनाथ ढवळे, राहुल काटे, भरती विनोदे यांनी राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश होऊ नये म्हणून अखेरपर्यंत खिंड लढवली होती. सबंधित पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर खलबते झाल्यामुळे बरेच दिसत केवळ चर्चा विरोध आणि माध्यमांमध्ये बातम्या येत असताना रखडलेला राहुल कलाटेंचा भारतीय जनता पार्टीतील पक्षप्रवेश आज मुंबईत संपन्न झाला.
मागील काही वर्षातील राजकारण पहिले तर, शिवसेना, राष्ट्रवादी वंचित युती असा एकंदरीत राहुल कलाटे यांचा राजकीय प्रवास झालेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राहुल कलाटेंनी कडवी झुंज दिली होती. तसेच आर एस एस आणि भाजपच्या विचारधारे विरुद्ध लढलेल्या राहुल कलाटेंचा भाजपत पक्षप्रवेश होऊ नये म्हणून स्थानिक नेत्यांनी पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार परिषद घेऊन कडाडून विरोध केला होता. आता पक्षप्रवेश अधिकृत रित्या झाल्यामुळे मूळ भारतीय जनता पार्टीतील स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट मिळविण्यासाठी देखील संघर्ष करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप मधील आपले महत्त्व कमी होईल अशी भीती कार्यकर्त्यांना वाटणे साहजिकच आहे. आता येणाऱ्या काळातच कळेल की स्थानिक भाजपा कार्यकर्ते राहुल कलाटेंच्या सोबत राहतील की काही वेगळा निर्णय घेतील!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा