राहुल कलाटे आज घेणार भाजपमध्ये जाहीर प्रवेश! कलाटेंची फौज मुंबईकडे रवाना!
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २३ : शहरातील राजकीय पटलावरील एक मोठ नाव राहुल कलाटे आज भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करणार असल्याची खात्रीशीर बातमी सूत्रांकडून कळली आहे. आज मंडळावर दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत पक्षप्रवेश होणार असून मोजक्या शिलेदारांनी फौज घेऊन राहुल कलाटे मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे. कलाटें च्या भाजप मध्ये प्रवेशाला वाकड येथील स्थानिक भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध होता. राम वाकडकर, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, विशाल आप्पा कलाटे, नवनाथ ढवळे, राहुल काटे, भरती विनोदे यांनी राहुल कलाटे यांचा पक्षप्रवेश होऊ नये म्हणून अखेरपर्यंत खिंड लढवली होती. सबंधित पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर खलबते झाल्यामुळे बरेच दिसत केवळ चर्चा विरोध आणि माध्यमांमध्ये बातम्या येत असताना रखडलेला राहुल कलाटेंचा भारतीय जनता पार्टीतील पक्षप्रवेश आज मुंबईत होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
इतिहास पहिला तर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राहुल कलाटेंनी कडवी झुंज दिली होती. तसेच आर एस एस आणि भाजपच्या विचारधारे विरुद्ध लढेल्या राहुल कलाटेंचाभाजपत पक्षप्रवेश होऊ नये म्हणून स्थानिक नेत्यांनी पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार परिषद घेऊन कडाडून विरोध केला होता. आता पक्षप्रवेश निश्चित झाल्यामुळे मूळ भारतीय जनता पार्टीतील स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी
तिकीट मिळविण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत असून भाजपतील आपले महत्त्व कमी होईल अशी भीती कार्यकर्त्यांना वाटणे साहजिकच आहे. आता येणाऱ्या काळातच कळेल की स्थानिक भाजपा कार्यकर्ते राहुल कलाटेंच्या सोबत राहतील की काही वेगळा निर्णय घेतील!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा