मालेवाडी येथील चोरीच्या गुन्ह्याचा तपास लावण्याचे प्रशासनाचे आश्वासन
| सांगावा न्यूज | पाथर्डी, दिनांक २९ : तालुक्यातील खरवंडी कासार परिसरातील मालेवाडी येथे झालेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणी खरवंडी कासार लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात झालेल्या जन आक्रोश मोर्चामुळे खरवंडी कासार येथील निद्राअवस्थेत गेलेली पोलीस चौकी पुन्हा एकदा कार्यरत करण्याचे आश्वासन पाथर्डी पोलीस प्रशासनाने दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले सदरील आंदोलनाचे नेतृत्व आजिनाथ किर्तने यांनी केले भगवानगड परिसरात गेल्या तीन चार महिन्यापासून मालेवाडी गावात जबरी चोरी आणि सशस्त्र दरोडा अशा जवळपास तीन ते चार घटना घडल्या होत्या यामुळे येथील कष्टकरी शेतकरी ऊसतोड मजूर यांनी प्रशासनाविरोधात प्रचंड आक्रोश निर्माण केला होता यामुळे खरवंडी कासार येथील पोलीस स्टेशन येथे २४ तास सुरू करून एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कॉन्स्टेबल ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला मालेवाडी जवळवाडी आणि इतर काही गावात झालेल्या चोरीच्या घटनेचा जलद गतीने तपास करून आरोपींना तातडीने अटक करण्यात येईल असे आश्वासन देऊन नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर यांना निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी या आंदोलनात भगवानगड परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी वामन किर्तने सरपंच सुनील खेडकर लहू दराडे वसंतराव खेडकर डॉ.ज्ञानेश्वर दराडे सुनील ढाकणे माणिक खेडकर भगवान हजारे विष्णू थोरात अशोक गोल्हार पांडुरंग खेडकर नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे निवृत्ती आगरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के लक्ष्मण पवार पोलीस कॉन्स्टेबल सुहास बटुळे संदीप नागरगोजे अमोल आव्हाड महेश रुईकर शिवाजी नागरे अमोल घुगे उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील खरवंडी कासार हे पूर्वीपासून सामाजिक व राजकीय केंद्र असल्याने लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात गेल्या दहा वर्षानंतर प्रथमच आजिनाथ किर्तने या कार्यकर्त्यामुळे सामाजिक चळवळीला प्रथमच बळ मिळाल्याने पोलीस प्रशासनाला खरवंडी कासार चौकी पूर्ण वेळ चालू ठेवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा लागला तसेच भ्रमरध्वनीवरून आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलकाशी चर्चा करून पुढील अधिवेशनात खरवंडी कासार पोलीस स्टेशन मंजूर असल्याने तातडीने निधी उपलब्ध करून खरवंडी कासार पोलीस स्टेशन कार्यरत करण्याचे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा