२९ महानगरपालिकेच्या निवडणुका मतदान येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार
| सांगावा न्यूज | मुंबई, दिनांक १५ : महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निवडणूक कार्यक्रमांच्या तारखा जाहीर झाल्या असून येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मतमोजणी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारीला मतमोजणी होईल. संबंधित महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमांच्या तारखा लक्षात घेता आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २९० निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करून पुरेसे सहाय्यक अधिकारी आणि पुरेसे कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत. निवडणूक अधिकारी दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक २०२६ निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम आणि त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे:
२९० निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक तसेच सहाय्यक अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत. मतदान दिनांकाच्या ४८ तास अगोदर प्रचाराला निर्बंध लावण्यात आले. आचार संहिता कालावधीमध्ये प्रसार माध्यमांवर देखील नियंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा केल्याचे सांगण्यात आले.
महानगरपालिका २९
जागा २८६९
महिला १४४२
*खर्च मर्यादा
अ वर्ग: १५ लाख
ब वर्ग: १३ लाख
क वर्ग: ११ लाख
ड वर्ग: १० लाख
आजपासून आचार संहिता लागू, म्हणजेच आज दिनांक १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू झाली आहे.
: निवडणूक कार्यक्रम, निवडणूक प्रक्रिया कालावधी :
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : २३ ते ३० डिसेंबर २०२५
छाननी : ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघारी घेणे : २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप व अंतिम यादी : ३ जानेवारी
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी : १६ जानेवारी २०२६
२० डिसेंबरला अंतिम मतदान यादी जाहीर होईल.
२७ डिसेंबर रोजी मतदार प्रभागाप्रमाणे मतदार यादी जाहीर होईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा