| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. ३० डिसेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता उमेदवारी अर्ज वितरण आज शेवटचा दिवस होता. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या १२८ जागांसाठी ५ हजार ९८१ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले. आज नामनिर्देशन वितरणाचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत विहीत वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण ३७० नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले आहे.
आज (३० डिसेंबर) सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभागनिहाय वितरित करण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या -
अ क्षेत्रीय कार्यालय -
प्रभाग क्र. १०, १४, १५, १९ साठी अनुक्रमे १५, ७, ७ व २७ असे एकूण ५६ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ब क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १६, १७, १८, २२ साठी अनुक्रमे ११, १७, १८ व २२ असे एकूण ६८ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
क क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २, ६, ८, ९ साठी अनुक्रमे ३, ६, १४ व ६ असे एकूण २९ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ड क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २५, २६, २८, २९ साठी अनुक्रमे ७, २, २ व ११ असे एकूण २२ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
इ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. ३, ४, ५, ७ साठी अनुक्रमे १६ ६,१ व ७ असे एकूण ३० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
फ क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. १, ११, १२, १३ साठी अनुक्रमे १३, ६, ० व २२ असे एकूण ४१ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ग क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २१, २३, २४, २७ साठी अनुक्रमे १६, १७, ८ व १० असे एकूण ५१ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.
ह क्षेत्रीय कार्यालय –
प्रभाग क्र. २०, ३०, ३१, ३२ साठी अनुक्रमे ८, २८, ३१ व ६ असे एकूण ७३ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा