| सांगावा न्यूज |पिंपरी , दिनांक ३० : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ अ खराळवाडी , गांधीनगर, मासुळकर कॉलनी,अजमेरा, यशवंत नगर, नेहरूनगर मधून पत्रकार सागर सुर्यवंशी यांनी शिवसेना ( उबाटा ) पक्षाकडून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ’क’ क्षेत्रीय कार्यालयात दाखल केला, यावेळी त्याच्या सोबत प्रभागातील नागरिक उपस्थित होते.पत्रकार सागर सूर्यवंशी हे भाजपचे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीने शेवटच्या क्षणी अन्याय केला.काही वेळ बाकी असताना त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून असलेली ओळख ही खरी ठरली, ऐनवेळी त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी देण्यात आली.पत्रकार सागर सूर्यवंशी यांचा प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्वसामान्य नागरिकासोबत चांगला जनसंपर्क आहे . सुशिक्षित, युवा नेतृत्व आणि अन्यायाविरुद्ध सर्वसामान्यासाठी आवाज उठवणारा अशी त्यांची प्रभागात ओळख आहे.माध्यमांशी सागर सुर्यवंशी बोलताना म्हणाले की, प्रभाग क्रमांक ९ मध्ये मागील काळात अपेक्षित विकासकामे न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्यांची दुरवस्था, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे स्थानिक नागरिकांना दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागत आहे.स्थानिक रहिवाशांच्या मते, माजी नगरसेवकांकडे, प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. मंजूर कामे कागदावरच राहिली असून प्रत्यक्षात विकासकामांचा वेग अत्यंत मंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवीन, कार्यक्षम आणि लोकाभिमुख उमेदवाराला निवडून देणे ही काळाची गरज आहे. जर प्रभाग क्रमांक ९ मधून नवीन उमेदवार निवडून दिला गेला, तर प्रलंबित विकासकामांना गती मिळेल, पारदर्शक कारभार होईल आणि मूलभूत सुविधांवर भर दिला जाईल. मी “फक्त आश्वासन देणार नाही, प्रत्यक्ष काम करणारा उमेदवार असल्याचे सूर्यवंशी म्हणाले.
मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५
प्रभाग क्रमांक ९ मधून सागर सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा