Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून निरंजन कुमार सुधांशू यांची तर निवडणूक निरीक्षक म्हणून सरिता नरके यांची नियुक्ती


| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. ३१ डिसेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) चे संचालक निरंजन कुमार सुधांशू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवडणूक निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून सांगली जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा सरिता नरके यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू यांच्या संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०९६०९०७५८ हा असून निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०९६०९०७५७ हा आहे. तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक यांचा अधिकृत ई-मेल आयडी observer.pcmc@pcmcindia.gov.in असा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा