Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, १२ मार्च, २०२६

सोन्याच्या बिस्किटांचे अमिश दाखवून महिलेकडून सोन्याची चैन घेऊन केली फसवणूक : भोसरी पोलिसांनी चोरांना पकडले

 

सोन्याच्या बिस्किटांचे अमिश दाखवून महिलेकडून सोन्याची चैन घेऊन केली फसवणूक : भोसरी पोलिसांनी चोरांना पकडले 

| सांगावा न्यूज |प्रतिनिधी दिनांक ११ : पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. फसवणूक करून एका महिलेची बळकावलेली सोन्याची चैन परत मिळवली. यासंदर्भात घडलेली घटना अशी की दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी २.३० च्या सुमारास एक महिला भोसरी ब्रीजवळ संविधान चौकातील रूपलक्ष्मी ज्वेलर्स येथे खरेदी करीत असताना तिच्याजवळ दोन अनोळखी इसम आले. संबंधित महिलेला ओळख वाढवून सांगितले की, आमच्याकडे दोन सोन्याची बिस्किटे आहेत. ती दोन सैन्याची बिस्किटे आम्ही तुम्हाला देतो त्या बदल्यात तुमच्याकडील सोन्याची चैन आम्हाला द्या असे सांगून विश्वास संपादन केला. त्याप्रमाणे सोने सदृश्य बिस्किटे आणि सोन्याची चैन अदलाबदल करून फसवणूक केली.

आपली फसवणूक झाली हे कळताच सदर महिलेने भोसरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. या संदर्भात तपास करीत असताना तपास पथक अधिकारी पोलिस उप निरीक्षक सोमनाथ टापरे, पोलिस उप निरीक्षक अमित कबडे आणि त्यांच्या स्टाफ ने तांत्रिक तपासा करून आरोपींचा शोध घेतला. यामध्ये आरोपी प्रकाश रमेश गायकवाड, वय ४५ वर्ष, राहणार सलगरा बुद्रुक, तालुका जिल्हा लातूर. पोलिसांनी मोठ्या चाचुर्याने सापळा रचून आरोपीला पकडून ७ मार्च रोजी अटक केले. फसवणूक करून हस्तगत केलेली त्याच्याकडील सोन्याची चैन परत मिळवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा