अर्धे जग महिला आहेत आणि उरलेला अर्ध जग महिलांमुळे आहे तरीही तिला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो ही कसली मानसिकता? __ प्रा. शितल जोशी
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ९ : इंदुताई भाई कोतवाल सभागृह डांगे चौक थेरगाव पुणे ३३ येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्नेह मेळावा उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते प्रा. शितल जोशी यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महिला दिनाच्या निमित्ताने बोलताना त्या म्हणाल्या की, उपस्थित महिला वर्गाशी चर्चा करताना असे जाणवले की शिक्षण, संस्कार, कुटुंब, माहेर, सासर या सगळ्या पलीकडे एक तत्त्व असते ते स्त्री तत्व एखाद्या दिवस जागतिक महिला दिन म्हणून तिचा सन्मान करण्यापेक्षा रोजच्या जीवनात तिला बरोबर वागणूक देऊन तिच्यातील शक्तीची प्रेरणेची जाणीव महत्त्वाची आहे. आज अर्धे जग महिला आहेत आणि उरलेला अर्ध जग महिलांमुळे आहे तरीही तिला जर हे वारंवार सिद्ध करावे लागत असेल तर ही कोणती मानसिकता आहे, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात माजी महिला अध्यक्ष सौ. अनिताताई मगर, भाग्यश्री साळुंखे, भाग्यश्री भाग्यवंत यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या श्रेया खंडागळे हिने राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा सादर केला. नाभिक समाजातील महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम महत्वाचा ठरला. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या भरगच्च आणि महत्त्व कार्यक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शहराच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. रूपालीताई संतोष गोरे, उपाध्यक्ष मोहिनीताई मुरकुटकर, माजी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनिताताई मगर, सुजाता वाळुंजकर, कविता यादव यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी राऊत यांनी केले आभार प्राजक्ता खंडागळे यांनी मानले. पिंपरी चिंचवड महिला आघाडीच्या कार्यकारिणींमध्ये सौ. वनिता अनिल कारेकर खजिनदार, सौ. पूनम मिलिंद वाळुंजकर, कार्याध्यक्ष सौ. रेखा प्रवीण पवार, सचिव मोहनीताई राजेश खंडागळे, सहसचिव यांना रूपालीताई गोरे अध्यक्ष यांनी नियुक्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला श्री. अशोक नारायण मगर (अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ) पुणे यांचे सौजन्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा