| सांगावा न्यूज | भोसरी, दिनांक ९ : भोसरी येथील शेठ रामधारी रामचंद्र आगरवाल प्राथमिक विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा . यावेळी वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रिया बगाडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .त्यांनी आपल्या व्याख्यानातून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच कुटुंबामधील महिलांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर आजच्या जगात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश्वर तरस उपस्थित होते. प्रमुख पाहुणे संचालिका सौ सुखदा देशपांडे व विजया सराफ यांनीही महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला व पालक उपस्थित उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिनकर मुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री विक्रम देशमुख यांनी व्यक्त केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा