| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २ मार्च : सिध्द योगी गुरुवर्य सदगुरुनाथ श्री. माऊली महाराज वाळुंजकर यांचा १०१ वा अभिष्टचिंतन सोहळा नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान, पिंपरी गाव येथे सर्व भक्तजन आणि शिष्य परिवार यांनी १ एप्रिल २०२६ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी परमपूज्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर यांनी, प.पू.परमहंस श्री भालचंद्र महाराज यांच्या आशीर्वादाने मिळालेले आयुष्य लोक कल्याणासाठी अर्पण केले. त्यामुळे आत्मिक समाधान प्राप्त झाले, असे उद्गार काढले.
यावेळी ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंत गडकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. कीर्तनरुपी सेवेसाठी 'बाबा अहंकार निशी घनदाट | गुरु वचनी फुटली पहाट | 'माना भक्ति भेटली बरंवंट | तिने मार्ग दाखविला चौकट गा || हा अभंग निवडला. यावेळी, आजकालच्या बुवाबाबांमुळे सगळं परमार्थिक वातावरण दूषित झाले आहे प्रत्येक भक्ताला कळकळीची विनंती की, ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीला महत्त्व देऊन 'जाणतेने गुरु भजनीचा' तेणे कडूजार होईल' कुठल्याही भक्तांनी बुवाबाजीला, भपकेगिरीला बळी न पडता तो आत्मज्ञानी आहे का? तो राजीयोगी आहे का? तो आत्मस्वरूपाशी एकनिष्ठ आहे का? तो ब्रह्मानंदात विलीन आहे का? ही परीक्षा घेऊनच मग त्याला शरण जावे असा समाजाला उपदेश केला.
सलग २ दिवस रक्तदान शिबिर घेऊन जवळजवळ १५० लोकांनी रक्तदान केले. होम हवन करून गुरुवर्य जय बाबांची फळांनी तुला करण्यात आली. ह.भ.प.पूनमताई नळकांडे यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम झाला. गुरुवर्य जय बाबांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ५००० पेक्षा जास्त भक्तांना अन्नप्रसाद देण्यात आला. माजी महापौर संजय वाघेरे, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी पक्ष नेते दत्तात्रय वाघेरे, मा. चेअरमन पीसीएमटी संतोष कुदळे, नगरसेविक रंगनाथ कुदळे, नगरसेविका प्रियंका कुदळे, मा. सभापती शिक्षण मंडळ श्रीरंग शिंदे, मा. नगरसेविका मीनाताई नानेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी जय बाबा भक्तगण व परिवार तसेच पिंपरी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. त्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय तरटे, श्री. अभिजित वाघेरे व सौ. वैष्णवी राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परमपूज्य श्री भालचंद्र महाराज आश्रम कणकवली. श्री सोहम सिद्ध दत्त व भालचंद्र महाराज आश्रम वाघोली. श्री क्षेत्र वडजाई, श्री क्षेत्र ढोमखेल, श्री लोहगाव श्री क्षेत्र अष्टापुर, श्री क्षेत्र केंदूर भक्तगण व शिष्य परिवार यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा