| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ५ एप्रिल : काळेवाडी येथे विराट हिंदू संमेलन अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. हिंदू एकता आणि संस्कृती रक्षणाच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात भव्य शोभायात्रेने झाली. विविध मार्गांवरून निघालेल्या या शोभायात्रेत भगवे ध्वज, ढोल-ताशा पथके आणि धार्मिक घोषणांनी वातावरण भारावून गेले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दल काळेवाडी प्रखंड यांनी सुरक्षेची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडली. या कार्यक्रमामुळे समाजामध्ये एकता आणि संस्कृतीबद्दल जागरूकता वाढीस लागल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखवली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा