Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, ६ एप्रिल, २०२६

शहराचे सौंदर्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन


शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाईचा दिला इशारा

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दि. ६ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड शहराचे सौंदर्य आणि शिस्तबद्धता जपणे ही प्रशासनासोबत नागरिकांचीही प्राथमिक जबाबदारी आहे. अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स आणि भिंतींवरील जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अशा प्रकारांना कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही. तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षकांना संबंधितांवर कठोर कारवाई करून जाहिरातदारांना नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तरी नागरिक आणि जाहिरातदारांनी नियमांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे, अन्यथा अनधिकृत फलक हटवून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतरित्या लावण्यात येणारे जाहिरात फलक, बॅनर्स, फ्लेक्स तसेच दूरध्वनी खांब, महावितरण डीपी आणि सार्वजनिक भिंतींवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. हे रोखण्यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख आणि बीट निरीक्षक यांच्या मार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करून अनधिकृत फलक, बॅनर्स, फ्लेक्स त्वरित हटवावेत. तसेच अशा जाहिरातींवर नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून संबंधित जाहिरातदारांना नोटिसा बजवाव्यात, अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत. 

याशिवाय, कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स अथवा भिंतींवरील जाहिराती लावणे हा नियमबाह्य प्रकार असून संबंधितांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व इतर लागू कायद्यांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार फलक तत्काळ हटवून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. 

"नागरिक आणि जाहिरातदारांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे. अनधिकृतरित्या जाहिरात फलक किंवा बॅनर्स लावणे टाळावे. अन्यथा संबंधित फलक हटवून त्वरित दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच महापालिका प्रशासन शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि शिस्तबद्ध जाहिरात व्यवस्थेसाठी कटिबद्ध असून सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे"
___डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा