Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

जय परशुराम सेवा संघाच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा


| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २० : भोसरी येथील जय परशुराम सेवा संघाच्या वतीने अक्षय तृतीया निमित्त भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सोहळ्याची सुरुवात पहाटे भगवान परशुराम यांच्या प्रतिमेच्या अभिषेक व षोडशोपचार पूजेने झाली. त्यानंतर सामूहिक आरती करण्यात आली. 'जय परशुराम'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेला फुलांचा देखावा भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला होता.
"भगवान परशुराम यांचे विचार आणि पराक्रम समाजातील तरुण पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दरवर्षी हा जन्मोत्सव सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीचा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे," असे जय परशुराम सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सांस्कृतिक सोहळा संध्याकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्याची सांगता महाप्रसादाने झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय परशुराम सेवा संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित सभासद महेश जोशी. मंजुषा जोशी. प्राजक्ता जोशी. शशिकांत कुलकर्णी. मिरा कुलकर्णी. सदिप कुलकर्णी. माऊली माडवगने. तात्या कुलकर्णी. शोभा कुलकर्णी. शिवाजी डागे विजयालक्ष्मी डागे. ज्योती कुलकर्णी. सिमा कुलकर्णी. लक्ष्मण कुलकर्णी. उज्वला मुळे, अशोक मुळे, गवादे परिवार, भास्कर काका, गिरीश कुलकर्णी, रेवती घोगरे, राजेंद्र घोगरे, मंजु घोगरे, रविंद्र घोगरे, श्री सुक्त मंडळ सर्व सभासद, सर्व सभासद महिला पुरुष उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा