Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

पिंपरी चिंचवड शहरातील ड व ह क्षेत्रीय कार्यालयांतील अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेची कारवाई



| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. २२ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात व्यापक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे गुरव येथील ५३० चौ.मी. तसेच ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवी सांगवी परिसरातील १ हजार ५४५ चौ.मी. अनधिकृत पद्धतीने उभारण्यात आलेल्या आरसीसी बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच इतर नियमबाह्य उभारण्यात आलेली बांधकामे देखील पाडण्यात आली.

मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधातील धडक निष्कासन कारवाईचा आढावा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकताच घेतला. त्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात कारवाई अधिक सक्त करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागांमध्ये व्यापक कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात वार्ड क्र. २९, पिंपळे गुरव येथील गणेशनगर, साईनाथनगर, लक्ष्मीनगर परिसरातील एकूण ५३० चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईवेळी उपअभियंता शाम गर्जे, बीट निरीक्षक विक्रम चव्हाण, राहुल निकम, उमेश लोंढे, ओंकार देशमुख, पूजा राठोड तसेच १३ एमएसएफ जवान, ७ मजूर, २ पोलीस, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि १ जेसीबी सहभागी होते.

ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वार्ड क्र. ३१ मधील नेताजी नगर, गांगर्डे नगर, विनायक नगर, गजानन नगर या भागात क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या नेतृत्वात एकूण १ हजार ५४५ चौ.मी. आरसीसी बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत उपअभियंता प्रताप मोरे, कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे, बीट निरीक्षक शाबोद्दिन बागबान, रोहन कांबळे, प्रफुल्ल भोकरे, सुरज माने तसेच १८ एमएसएफ जवान, १० मजूर, २ ट्रॅक्टर ब्रेकर आणि १ जेसीबी यांच्या सहाय्याने ही कारवाई पार पडली.

महापालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत विविध ठिकाणी विनापरवानगी आरसीसी बांधकामे, शेड तसेच इतर स्वरूपाची अनधिकृत वाढ आढळून आली. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करत सुमारे काही हजार चौरस फूट क्षेत्रफळातील बांधकामे हटविण्यात आली.

"पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या कारवाईचा नियमित आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने पाहणी करावी. रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्या फेरीवाल्यांवर देखील कारवाई करण्यात यावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या तसेच शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. नागरिकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे"
___डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा