अनुसूचित जातीतील सर्व जातींसाठी न्याय मिळविण्याचा निर्धार; गट-तट विसरून सर्व समाज लढ्यासाठी सज्ज __युवराज दाखले
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक २७ एप्रिल २०२६ : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे पूर्णाकृती स्मारक निगडी येथे दिनांक २६ एप्रिल रोजी मातंग समाजाच्या पुढाकारातून आरक्षणातील ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भव्य व व्यापक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत मातंग समाजातील ज्येष्ठ नेते, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, ज्येष्ठ विधीज्ञ, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षकवृंद, संपादक, पत्रकार, विद्यार्थी, समाजसेवक तसेच युवा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून, उपेक्षित व वंचित घटकांसाठी नवसंजीवनी ठरणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. आरक्षणाचा खरा लाभ समाजातील तळागाळातील, मागे राहिलेल्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक असल्याचे ठामपणे मांडण्यात आले.
यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आजपर्यंत काही मोजक्या घटकांपर्यंतच आरक्षणाचे फायदे मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे समाजातील इतर मागास व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरणाची अंमलबजावणी ही काळाची गरज बनली आहे. हा लढा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून, तो सर्व वंचित घटकांच्या हक्कांसाठीचा व्यापक सामाजिक संघर्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत सर्वांनी एकमुखाने ठरवले की, आगामी काळात या प्रश्नावर संघटित व ताकदीने लढा उभारला जाईल. यासाठी गट-तट, पक्षभेद बाजूला ठेवून समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “आपल्याला एक जात म्हणून नव्हे, तर अनुसूचित जातीतील घटकांच्या हक्कांसाठी लढायचे आहे,” असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला.तसेच, जनजागृती मोहिमा, सभांचे आयोजन आणि शासन दरबारी पाठपुरावा अशा विविध स्तरांवर हा लढा उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.
आजची ही बैठक केवळ एक कार्यक्रम नसून, सामाजिक न्यायाच्या दिशेने उचललेले एक ठोस पाऊल ठरले आहे. पिंपरी चिंचवड शहरातून सुरू झालेली ही एकजूट आगामी काळात राज्यभरात मोठ्या आंदोलनाचे रूप धारण करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या बैठकीचे नियोजन साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व समितीचे मा अध्यक्ष नेते संदिपान झोंबाडे, बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल, मा अध्यक्ष मार्गदर्शक डी पी खंडाळे, हिंदू मातंग सेनेचे विश्वस्त तथा उद्योजक अनिल गायकवाड, मांगल्य प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष राजू आवळे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा हिंदू मातंग सेनेचे मुख्य प्रवक्ते तथा कार्यकारी प्रमुख युवराज दाखले यांनी केले होते. विधानपरिषद आमदार अमित गोरखे म्हणाले की, उपेक्षित व मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार सर्वांनी मिळून केला आहे.
यावेळी विधानपरिषद आमदार अमित गोरखे, नगरसेवक बापूसाहेब घोलप, जेष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे,मातंग समाजाचे नेते संदिपान झोंबाडे, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व मा अध्यक्ष तथा बहुजन विकास आघाडी संस्थापक अध्यक्ष संजय धुतडमल, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व मा अध्यक्ष मार्गदर्शक डी पी खंडाळे, हिंदू मातंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मा अध्यक्ष अरूण जोगदंड, सचिव संजय ससाणे, हनुमंत उर्फ नाना कसबे, उद्योजक अनिल दादा गायकवाड, मा अध्यक्ष सतिश भवाळ, सुनील भिसे, भगवान शिंदे, नितीन घोलप, सामाजिक कार्यकर्ते निलेश गायकवाड, मारूती दाखले, सा.लो. डॉ अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व अध्यक्ष बाबा रसाळ, सचिव विशाल कसबे, सामाजिक कार्यकर्ते मारूती जाधव, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजी खडसे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, विक्रम गायकवाड, आण्णासाहेब कसबे, तसेच आशाताई शहाने, शिवशाही व्यापारी संघ उपनेत्या उषा माई कांबळे, महानंदा चव्हाण, संगीता नाणेकर, रंजना चणे, दिपाली लोंढे , ललिता गायकवाड, मंचक लोंढे, वैशाली जाधव, सविता आव्हाड, मोहन भिसे, हिरामण जाधव, युवराज कळवले, मुरलीधर झोंबाडे, शिरीष देवकुळे ,निचिकेत खरात, सुरेश सकट, आनंद घेडे, राजेश दोडके, अविनाश देवकुळे, हेमंत देवकुळे, रोहित अडागळे, राजू खुडे, उद्योजक निलेशदादा गायकवाड, चंद्रकांत दादा लोंढे, सुनील खुडे, केंद्रे सर, शिवाजी साळवे, गणेश अवघडे, तसेच अद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व अध्यक्ष गणेश कलवले, अविनाश शिंदे, शंकर खवळे, मा अध्यक्ष बाबू पाटोळे, धिरज सकट, आण्णा लोखंडे, पै विठ्ठल शिंदे, अक्षय उदगिरे, सरपंच संदिप जाधव, अमोल कुचेकर, मातंग एकता आंदोलनाचे हिरामण खवळे, अविनाश लोणारे, जेष्ठ नेते सोपान चव्हाण, काशींदर कांबळे, गणेश लोंढे, राहुल पाटोळे, अविनाश घोडेकर, सचिन काळे, विठ्ठल वाघमारे, आनंद नायडू, आनंद कांबळे, सन्नी गवई, पत्रकार संतोष रनसिंग आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान ही बैठक केवळ औपचारिक न राहता सामाजिक न्यायासाठीची ठिणगी ठरली असून, “आरक्षणात समता हवीच” या घोषणेने पिंपरी नगरी दणाणून गेली. आगामी काळात हा लढा अधिक तीव्र होणार असून, शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास राज्यभर उग्र आंदोलन उभे राहील, असा स्पष्ट इशारा संजय धुतडमल व युवराज दाखले यांनी यावेळी दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा