Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

बुधवार, ६ मे, २०२६

निर्भया वरील अत्याचार संबंधी दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबत काळेवाडीच्या एका लोकप्रतिनिधीकडून पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या सभागृहात केली दिशाभुल __  पोलिस प्रशासनाची माहिती

 

नगरसेवकाने स्वतःची प्रसिध्दी व्हावी व पोलीस दलाची प्रतिमा, गृहविभागाची प्रतिमा मलीन व्हावी या आकसबुध्दीने सदरची व्हिडीओ क्लिप केली प्रसारित  __ पोलिसांचे स्पष्टीकरण

पोलिसांवर आरोप करणाऱ्या नगरसेवकाने प्रसारीत केलेली व्हिडिओ क्लिप केवळ दिशाभूल करणारी __ पिंपरी चिंचवड पोलिस 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ६ : काल दिनांक ०५/०५/२०२६ रोजी सोशल मिडीया मध्ये प्रसारित झालेल्या व्हिडिओतील विषया नुसार, काळेवाडी भागातील एक लोकप्रतिनीधी हे पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या सभागृहात प्रश्न उपस्थित करून म्हणाले की, " काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बहीरट यांनी गुन्हा दाखल करताना साक्षीदार आणा, अशी मागणी केली व अरेरावीची भाषा वापरली अशा आशयाची व्हिडीओ क्लिप प्रसारीत केलेली आहे" यावर पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढून दिलेल्या माहितीनुसार "सदरची बाब चुकीची आहे त्यात कोणतेही तथ्य नाही असे स्पष्ट मत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने प्रेस नोट जारी करून माध्यमांना सांगितले"

पिंपरी चिंचवड शहरातील दिनांक .१४/०४/२०२६ रोजी वायसीएम हॉस्पीटल, पिंपरी येथील एमएलसी नं. २७८१/२०२६ अन्वये एक निर्भया ही उपचारकामी ऍडमिट झाली. तीच्यावरवर जबरदस्तीने लैंगीक अत्याचार झाला आहे अशी एमएलसी द्वारे प्राप्त माहितीनुसार काळेवाडी पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व महीला अंमलदार असे वायसीएम हॉस्पीटल, पिंपरी येथे रवाना झाले. हॉस्पीटल मध्ये जावुन पिडीत निर्भया व तीची आई यांचेकडे चौकशी केली असता, मुलीच्या आईने सांगीतले की, त्यांचे शेजारी राहणाऱ्या इसमाने त्यांच्या लहान मुलीस आंबा खाण्यासाठी देतो असे अमिष देवुन तीला त्याच्या खोलीत नेवुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला असे सांगितल्याने तात्काळ त्यांचा सविस्तर जबाब नोंदवून गु.रजि.नं.१५९/२०२४ भा.न्या.सं.क. ६४(२) (1), ६५ (२) सह बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ प्रमाणे दि.१४/०४/२०२६ रोजी १०.३१ वा तात्काळ गुन्हा दाखल केला गेला.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ ०२, मा. सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग यांनी घटनास्थळी भेट देवुन तपासाबाबत काळेवाडी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथक तसेच इतर पोलीस ठाणेंचे तपास पथकास आदेशीत करुन आरोपीचा शोध घेणेस रवाना केले. तपास पथकाने कसोशीने शोध घेवून आरोपी विजय पोपट भोसले वय ४७ वर्षे रा. दिघेचाळ, नढेनगर काळेवाडी पुणे याचा चाकण, भोसरी परीसरात शोध घेवुन त्यास भोसरी उड्डाणपुलाच्या खालुन ताब्यात घेतले. या घटनेची गंभीर दखल घेऊन दि.१४/०४/२०२६ रोजी १७.०२ वा. त्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीस मे. कोर्टात हजर करुन त्याची पोलीस कोठडी घेवुन त्याच्या विरुध्द् सबळ पुरावा हस्तगत करण्यात आलेला असुन आरोपी विरुध्द् दोषारोपपत्र पाठविपाठविण्याची  तजविज ठेवली गेली आहे.

सदरचा गुन्हा दि.१४/०४/२०२६ रोजी दाखल व त्याच दिवशी आरोपीस अटक करण्यात आले आहे. दाखल गुन्हयाची बातमी प्रसिध्द झाल्या नंतर तीन दिवसांनी काळेवाडी भागातील एक लोकप्रतिनिधी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेवुन आरोपीविरुध्द् कडक कारवाई करणेबाबत निवेदन दिले होते.

काल दिनांक ०५/०५/२०२६ रोजी सोशल मिडीया मध्ये काळेवाडी भागातील लोकप्रतिनीधी यांनो पिंपरी चिंचवड महानगरपालीकेमध्ये काळेवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बहीरट यांनी गुन्हा दाखल करताना साक्षीदार आणा अशी मागणी केली व अरेरावीची भाषा वापरली अशी व्हिडीओ क्लिप प्रसारीत केलेली आहे. सदरची बाब चुकीची आहे त्यात कोणतेही तथ्य नाही असे स्पष्ट मत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाने प्रेस नोट जारी करून माध्यमांना सांगितले.

वास्तविक दि.१४/०४/२०२६ रोजी सकाळी १०.३१ वा गुन्हा नोंद होवुन त्याच दिवशी आरोपीचा शोध घेवुन त्यास ५.०२ वा. आरोपीने केलेल्या गुन्ह्यात अटक केली होती. सदरची बातमी वर्तमानपत्रमध्ये प्रसारीत झाल्यानंतर नगरसेवक यांनी तीन दिवसांनी निवेदन दिले होते. परंतु त्यांनी स्वतःची प्रसिध्दी व्हावी व पोलीस दलाची प्रतिमा तसेच पर्यायाने गृहविभागाची प्रतिमा मलीन व्हावी या आकसबुध्दीने सदरची व्हिडीओ क्लिप पोलिसांवर आरोप करणाऱ्या नगरसेवकाने प्रसारीत केलेली असू शकते. केवळ यातून दिशाभूल होत आहे, असे मत पोलिस प्रशासनाने व्यक्त करून आपली बाजू ठाणावणे मांडली.

काळेवाडीतील नगरसेवक विनोद नढे यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांचे नाव घेऊन सभागृहात त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला होता. काळेवाडीत एका लहान निर्भयावर झालेल्या अत्याचार संदर्भात कडक कलमे लावली नाहीत असा आरोप करून, जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये तीन नगरसेवकांसह सबंधित प्रकरणात चौकशी कामी गेलो असता संबंधित पोलिस अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा केली असे नगरसेवक विनोद नढे यांनी सभागृहात सांगितले.

यासंदर्भात माध्यमांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांच्याशी संपर्क साधून या संबंधी विचारले असता, श्री बहिरट म्हणाले की," ज्या दिवशी निर्भयावर अत्याचार झाला त्याच दिवशी पोलिसांनी अत्यंत कठीण परिस्थितीत तत्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केले. आरोपीवर कायदेशीर गुन्हा दाखल केला. जेवढे कडक कलम लावता येतील तेवढे कडक कलमे लावून आरोपीला कायदेशीर अटक केले. त्यानंतर आमच्यावर आरोप करणारे नगरसेवक तीन दिवसांनी निवेदन घेऊन आले. मूलतः योग्य तो तपास करून आम्ही अगोदरच आरोपीला अटक केले. नगरसेवकांना साक्षीदार आणा असे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही किंवा तसे काही बोलले गेले नाही. पोलिस यंत्रणांनी तत्काळ ऍक्शन घेऊन कारवाई केली असताना पुन्हा साक्षीदार आणा असे  लोकप्रतिनिधींना बोलण्याची गरजच उरत नाही" असे काळेवाडी पोलिसांनी आपली बाजू मांडून नगरसेवकाने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे तथ्यहीन आणि बेछूट आहेत. काही पूर्वग्रह दूषित विचार मनात ठेवून पोलिसांना आणि पर्यायाने गृहखाते तसेच अप्रत्यक्ष सरकारच्या कार्यपद्धतीवर गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे मत मांडून सर्व आरोप पोलिसांनी फेटाळून लावले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा