संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड सह विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने आंदोलन
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ५ मे २०२६ :
नसरापूर व चाकण येथील बालकांवर लैंगिक अत्याचार करून झालेले खून याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवार रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले दर महिन्याला राज्यात महिला व लहान मुलींवर लैगिक अत्याचाराची शेकडो प्रकरणे घडत असून यावर सरकारकडून कोणतेही ठोस उपाय होत नाहीत. घटना घडली की सरकारच्या वतीने कडक कारवाई करू आरोपीला लवकरात लवकर फाशी देणार केस जलदगती न्यायालयात चालवणार अशी आश्वासने देऊन जनतेला शांत केले जाते परंतू गेल्या दहा वर्षांत एकाही गुन्हेगाराला फासावर लटकवले नाही उलट गुन्हेगार जामिनावर सुटून मोकाट फिरत आहेत या विषयी उपस्थित मान्यवरांकडून तीव्र भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांसह सरकारचा निषेध करण्यात आला तसेच नसरापूर व चाकण बालकांवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशी देण्याची मागणी करण्यात आली तसेच गुन्हेगारांचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजीमहाराज यांचे आशीर्वाद घेऊन सत्तेवर आलेले सरकार छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या विचाराने चालवले जात नाही त्यामुळे यापुढे सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवाजीमहाराज यांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नाही अशा प्रकारची मनोगते सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव,जिजाऊ ब्रिगेडच्या कल्पना गिडडे, काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी व्यक्त केली.या निषेध आंदोलनासाठी संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे,प्रविण कदम,मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव,आबासाहेब ढवळे,वसंत पाटील,जिजाऊ ब्रिगेडच्या सुलभा यादव, मोनिका भोसले,कल्पना गिडडे, शितल मोरे,सोनिया दिलपाक तसेच मानव कांबळे,प्रदीप पवार,भैय्यासाहेब गजधने, आनंदा कुदळे,विक्रम पवार,काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, गिरिजा कुदळे,जितेंद्र छाबडा, विष्णू नेवाळे यांच्यासह शेकडो आंदोलक उपस्थित होते. आंदोलनाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे व काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा