Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, ८ मे, २०२६

धारधार शस्त्राने वार करून थेरगावमध्ये एकाचा खून तर दुसरा गंभीर जखमी


प्रेम प्रकरणातील वादाचे रूपांतर भांडणात आणि त्यातून एकाचा खून 

| सांगावा न्यूज | काळेवाडी/थेरगाव, दिनांक ८ : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील शिवशंकर कॉलनी येथे दोन तरुणांवर धारधार शास्त्राने वार केल्याची घटना दिनांक ७ मे २०२६ रोजी रात्री ११. वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एका तरुणाचा खून झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सूरू आहेत. याप्रकरणी २ आरोपी पोलिसांनी पकडले असून पुढील तपास सुरू आहे. काळेवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट आणि त्यांच्या स्टाफ ने अवघ्या १२ तासांच्या आत आरोपींना पकडुन अटक केल्याची कामगिरी केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की,  दि.०७/०५/२०२६ रोजी २३.०० वा सुमारास चायनिज सेंटर शिवशंकर कॉलनी, थेरगाव पुणे व बालाजी कॉलनी येथील मुख्य रस्त्यावर श्री. कृष्ण दूध डेअरी समोर रोडवर, थेरगाव पुणे येथे मुलगा सुभान व एक मुलगी यांचे प्रेमसंबंधास होते याला मुलीच्या आईचा विरोध होता. मुलीची आई यांच्या ओळखीचे एक इसम विशाल सुर्यवंशी याने पुढाकार घेऊन सुभान याला सांगितले की, मुलीच्या प्रेमाचा नाद सोडुन दे असे म्हणुन त्यांच्यात झालेल्या वादातून विशाल सुर्यवंशी व अनिकेत सुर्यवंशी दोघे रा.थेरगाव पुणे यांनी सुभान हमीद शेख वय १९ वर्षे रा. गुलमोहर कॉलनी रहाटणी पुणे व अर्षद रमजान शेख वय २१ वर्षे रा. शिवशंभो कॉलनी, बारणे बिल्डींग, थेरगाव पुणे यांचेवर चाकु, चॉपरने हल्ला करुन सुभान च्या हातावर, पोटात, मानेवर वार करुन त्याचा खुन केला तसेच अर्षद शेख याच्या हातावर, पोटात वार करुन त्यास गंभीर जखमी केले असल्याबद्दल मृत मुलाच्या नातेवाईकाने काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा