Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, ७ मे, २०२६

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडून चेतन पवार यांची शहर प्रमुखपदी नियुक्ती

 

| सांगावा न्यूज |  पिंपरी चिंचवड, दिनांक ६ : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाकडून कडून चेतन पवार यांची शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी अभिमानाची असल्याची भावना व्यक्त केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीपेक्षा शहर प्रमुख म्हणून प्रशासनाकडून होणाऱ्या कामांना योग्य दिशा देत जनसामान्यांना न्याय मिळवून देणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. शहरातील पाणी, रस्ते, वाहतूक आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून संबंधित यंत्रणांवर आवश्यक तो पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संवादातून मतभेद दूर करत पक्षाची ताकद वाढवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाशी समन्वय साधत काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा