पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीत कारवाई : ०९ देशी कटटे, ०५ अतिरिक्त मॅक्झिन व ४६ जिवंत काडतुसे असा ०८ लाख रुपये किंमतीचा अवैध अग्निशस्त्र/शस्त्र साठा जप्त
| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड , दिनांक ६ : देहुरोड परिसरात व्यापा-यावर झालेल्या गोळीबार करुन हत्या केल्याच्या घटनेच्या पर्श्वभूमीवर तसेच पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय परिसरात वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्या करीता केलेल्या कारवाई अंतर्गत ०४ आरोपींकडून एकुण ०९ देशी कटटे, ०५ अतिरिक्त मॅक्झिन व ४६ जिवंत काडतुसे असा ०८ लाख रुपये किंमतीचा अवैध अग्निशस्त्र/शस्त्र साठा जप्त केला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली.
मा. पोलीस आयुक्त सो, श्री विनय कुमार चौबे सो, सह. पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त डॉ. विशाल हिरे, यांचे सूचना व आदेशान्वये पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीत अवैध अग्निशस्त्र कारवाई मोहीम असतानाच देहुरोड पोलीस ठाणे हददीत व्यापाऱ्यावर गोळीबार करुन हत्या अशी गंभिर घटना घडली. त्या अनुशंगाने मा. पोलीस आयुक्त सो, श्री विनय कुमार चौबे यांनी सुचना देवून कारवाई अतितीव्र करणे बाबत आदेश दिल्या प्रमाणे पोलिस अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुळीग, श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी यांना मार्गदर्शन करुन, सुचना देवुन आयुक्तालय हददीत, गोपनिय माहीती प्राप्त करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर कारवाई करीत असताना श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी यांना प्राप्त खबरी नुसार अवैध शस्त्रां संबधी गोपनीय माहीती प्राप्त झाली. सदर बाबत खात्री करतांना पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्रमांक २३४/२०२६ आर्म ॲक्ट कलम ३(२५), मपोका कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. प्राप्त खबरी नुसार ठोसकारवाई करणे करीता सदरचा गुन्हा मा. वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट ०१, कडे वर्ग करुन घेवुन सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान, खालील आरोपींना अटक करण्यात आलेले आहे.
१. अझरुद्दीन रफिक सुतार
वय ३० वर्षे रा. महाराष्ट्र
कॉलनी थेरगाव, पुणे.
२. वैभव अशोक शेटे
वय ३१ वर्षे रा. महाराष्ट्र कॉलनी
थेरगाव पुणे.
३. सौरभ धनंजय जाधव
वय २७ वर्षे, रा. पाषाण पुणे.
४. अक्षय अशोक कांबळे
वय ३१ वर्षे रा. पाषाण पुणे
यांचेकडून सदर गुन्ह्याच्या तपासात एकूण ९देशी कटटे.०५ अतिरिक्त मैकझिन व ४६ जिवंत काडतुसे, ०२ वाहने, असा ०८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल व अवैध अग्निशत्र साठा जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि दत्तात्रय गुळीग करीत आहेत.
सदरची कारवाई सपोनि गुळीग, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक स्वामी, सपोफौ वेताळ, इंगळे, पोहवा जयवंत राऊत, अजय डगळे, देवा राऊत, मारुती करचुंडे, शिवराम भोपे, विजय शेळकंदे, सागर अवसरे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, पोलीस कॉन्स्टेबल, संदेश देशमुख, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, केशव चेपटे, सोहेल चिखलकर, उध्दव खेडकर, दिपक तांदळे, यांनी केलेली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा