Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, १ मे, २०२६

RTE अंतर्गत प्रवेश मिळवून देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारतांना एकाला रंगे हात पकडले! शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांची नावे उघड होण्याचा शक्यता!


यातील दोषी व्यक्ताला सोडविण्यासाठी एका नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची पोलिस स्टेशनला धाव!

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक  १ मे २०२६ : गेली अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षण क्षेत्रातील घोटाळे, अनधिकृत फी, तसेच शिक्षण संस्थांनी पालकांची वेगवेगळ्या मार्गाने चालवलेली लूट अशा तक्रारी आणि बातम्या वारंवार प्रसिद्ध होऊन देखील शिक्षण विभागाकडून सबंधित शाळा प्रशासन व संस्थांवर कठोर कारवाई केलेली दिसत. केवळ नोटीस काढून दिखाऊपणा केला जात असल्याचे समोर येत असून वेळकाढूपणा केला जात आहे. गुरुवार दिनांक ३० एप्रिल रोजी उघडकीस आलेला भ्रष्टाचाराचा प्रकार म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आहे. RTE (Right to Education) अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली लाच स्वीकारणाऱ्या एका व्यक्तीला लाच घेताना आकुर्डी निगडी हद्दीत रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी पालकांकडून RTE प्रवेशासाठी हमी देत मोठ्या रकमेची मागणी करत होता. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून त्याला लाच स्वीकारताना पकडण्यात आले. कारवाईदरम्यान रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. दिनांक ३० एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकरणात पालक आणि पाल्य पात्र असूनही अपात्र झाल्याचे सांगून पात्र करण्यासाठी एका एजंटने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्ष सहभागाने पालकांकडून पैशाच्या स्वरूपात लाच मागितली. सबंधित पालकांना सतर्कता दाखवत लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधून आपला रचून या एजंटला रंगेहात पकडले.

या प्रकरणात केवळ एकट्या व्यक्तीचा सहभाग नसून शिक्षण विभागातील काही बड्या अधिकाऱ्यांचाही संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा आता या रॅकेटचा संपूर्ण भांडाफोड करण्याच्या तयारीत असून, येत्या काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, RTE प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

पिंपरी चिंचवड शहरात RTE (Right to Education) अंतर्गत प्रवेश मिळवून देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेल्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या घटनेनंतर संबंधित आरोपीवर कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते याबाबत चर्चा सुरू झाली असून, तपास यंत्रणा विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ (Prevention of Corruption Act) अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. जर संबंधित व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा शासकीय यंत्रणेशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले, तर त्याच्यावर कलम ७ (लाच स्वीकारणे) आणि कलम १३ (भ्रष्ट आचरण) अंतर्गत कठोर कारवाई होऊ शकते. या कलमानुसार दोषी आढळल्यास किमान ३ वर्षे ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय, जर आरोपी खासगी व्यक्ती असूनही सरकारी प्रक्रियेत बेकायदेशीर हस्तक्षेप करत असल्याचे निष्पन्न झाले, तर त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत फसवणूक (कलम ४२०), विश्वासघात (कलम ४०६) आणि बनावट कागदपत्रांचा वापर (कलम ४६८, ४७१) यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरल्यास दीर्घकालीन कारावासाची तरतूद आहे.

तपासादरम्यान जर शिक्षण विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी या प्रकरणात सहभागी असल्याचे उघड झाले, तर त्यांच्यावर विभागीय चौकशी (Departmental Inquiry) सुरू होऊन निलंबन, सेवेतून बडतर्फी यांसारखी कठोर प्रशासकीय कारवाई देखील होऊ शकते. तसेच, अशा अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा परिणाम केवळ आरोपीपुरता मर्यादित राहणार नसून, RTE प्रवेश प्रक्रियेवर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून आता प्रवेश प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन पडताळणी, थेट शाळांशी संपर्क आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. पालकांना देखील कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुढील तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गांभीर्याची गोष्ट म्हणजे दोषी व्यक्तीला या प्रकरणातून सोडविण्यासाठी शहरातील एक नगरसेवक आणि काही सामाजिक कार्यकर्ते संबंधित पोलिस स्टेशनला आले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पकडल्या गेलेल्या दोषी व्यक्तीवर  दिनांक ३० एप्रिल रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया चालू होती. आता पुढील तपासात  कोण कोणत्या बड्या पुढाऱ्यांचा आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा संबंधात या प्रकरणात आहे ते उघडकीस येईलच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा