Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

माझे शहर, माझी जबाबदारी अंतर्गत स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेचा अनोखा उपक्रम


| सांगावा न्यूज | पिंपरी : २३ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “क” क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक ०६ पांडवनगर, भोसरी येथे “स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६” संदर्भात नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची सामूहिक शपथही देण्यात आली.

“माझे शहर, माझी जबाबदारी” या अभियानांतर्गत महापालिकेकडून शहरभर विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये भाजी मंडई, रस्त्यावर विक्री करणारे व्यावसायिक, चौक-रस्ते, सिग्नल बस स्थानके तसेच शाळा व महाविद्यालये येथे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

 मी स्वच्छाग्रही, मी कचरा करणार नाही, मी स्वच्छाग्रही, प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करेल, मी स्वच्छाग्रही, मी माझा परिसर स्वच्छ ठेवेल, मी स्वच्छाग्रही, माझ्या घरातील ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा व सॅनिटरी कचरा वेगवेगळा करुन घंटा गाडी मधेच देईल, मी स्वच्छाग्रही, माझ्या पर्यावरणाचे रक्षण करेल, मी स्वच्छाग्रही, मी इतरत्र कुठेही थुंकणार नाही,मी स्वच्छाग्रही, मी रस्त्यावर कुठेही लघुशंका करणार नाही, मी स्वच्छाग्रही, माझे शहर कुठल्याही प्रकारे बिल, स्टिकर, बॅनर लाऊन विद्रुप करणार नाही, मी स्वच्छाग्रही कारण माझे शहर माझी जबाबदारी आहे, स्वच्छतेचा संकल्प पाहिला क्रमांक अशा प्रकारे नागरिकांना संदेश देत या उपक्रमांद्वारे नागरिक, व्यापारी व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न होत असून, अधिकाधिक नागरिकांनी शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उप आयुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांनी यावेळी केले. 

या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल तसेच सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

स्वच्छतेचा संदेश कृतीतून रुजवत, पिंपरी चिंचवड शहर “स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६” मध्ये अग्रस्थानी राहण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही पिंपरी चिंचवड महानगरपालिका उप आयुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांनी आपले यावेळी सांगितले.

"स्वच्छता ही प्रत्येक नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या भावनेतून नागरिकांनी पुढाकार घेतल्यास पिंपरी चिंचवड शहर निश्चितच स्वच्छ सर्वेक्षणात अग्रस्थानी राहील. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सातत्यपूर्ण जनजागृती यामुळेच स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी ठरेल"
___डॉ. विजय सूर्यवंशी  
(आयुक्त,पिंपरी चिंचवड महानगरपालिका)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा