Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून घरपोच मालमत्ता कर बिल वाटपाला सुरुवात


| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. २३ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी मालमत्ता कर बिलांचे घरपोच वाटप महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकापर्यंत कर बिल वेळेत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून, बिल वाटपासाठी येणाऱ्या महिलांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र तसेच मोकळ्या जागांसह सुमारे ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मिळकती आहेत. मालमत्ता सर्वेक्षणातून नव्याने सापडलेल्या मिळकतींची नोंदणी सुरू असून, एकूण मिळकतींची संख्या ८ लाखांपर्यंत होण्याची शक्यता आहे. या सर्व मिळकतींच्या कर देयकांचे वितरण महिला बचत गटांमार्फत घरोघरी करण्याची कामकाज महापालिकेने महिला आर्थिक विकास महामंडळ यांना दिलेले आहेआहे. गेल्या तीन वर्षांत महिलांनी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे.

कर आकारणी व कर संकलन विभागाने यावर्षी पर्यंत सर्व देयकांचे वितरण पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्याबाबत जप्तीपूर्वीची नोटीस देयकासोबत दिली जाणार असून, त्यामुळे नागरिकांना वेळेत कर भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, करासंदर्भातील माहिती देणे आणि प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे अशी कामेही केली जाणार आहेत.

या उपक्रमातून महिला सक्षमीकरणालाही चालना मिळत आहे. समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गट फेडरेशनच्या ६०० हून अधिक महिलांमार्फत ही मोहीम राबवली जात आहे. तसेच, ‘सिद्धी’ अ‍ॅपच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना घरपोच बिल वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजिटल प्रणालीमुळे वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि सुलभ झाली आहे.

"पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकेंद्री सेवेला प्राधान्य देत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून मालमत्ता कर बिलांचे घरपोच वितरण केल्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होतो. ही मोहीम केवळ कर संकलनापुरती मर्यादित नसून महिला सक्षमीकरणालाही चालना देणारी आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत वेळेत कर भरावा"
___डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका)

"पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून मालमत्ता कर बिलांचे घरपोच वितरण हा त्याच दिशेने उचललेला महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना वेळेत माहिती मिळून कर भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे, तसेच महिलांना रोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाची संधी मिळत आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला कर वेळेत भरावा"
__तृप्ती सांडभोर (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका)

"मालमत्ता कर बिलांचे शंभर टक्के वितरण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.‘सिद्धी’ अ‍ॅपच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले मोबाईल क्रमांक अद्ययावत करून वेळेत कर भरावा, तसेच थकबाकी असल्यास तत्काळ भरणा करून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा"
___सचिन पवार (उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा