Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, १३ एप्रिल, २०२६

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये एवढ्या शाळा अनधिकृत; पालकांना प्रवेश न घेण्याचे आवाहन


पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर ! पालकांची चिंता वाढली!

अखेर शिक्षण विभागाला आली जाग ! अनधिकृत असलेल्या शिक्षण संस्था शाळांवर कारवाई केली जाईल अशी नोटीस 

| सांगावा न्यूज | पिंपरी-चिंचवड, दिनांक १३ मार्च २०२६ : शहरातील १५ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) शिक्षण विभागाने पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संबंधित शाळांमध्ये या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, अशी स्पष्ट सूचना देत शिक्षण विभागाने अधिकृत नोटीस काढून अनधिकृत शाळांची यादीही जाहीर केली आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, या शाळा मागील अनेक वर्षांपासून सुरू होत्या. मात्र आवश्यक परवानग्या, मान्यता व शैक्षणिक निकष पूर्ण न केल्यामुळे त्या अनधिकृत असल्याचे यंदा स्पष्ट झाले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाल्यांच्या प्रवेशापूर्वी संबंधित शाळेची मान्यता तपासून घ्यावी. तसेच अधिकृत मान्यता नसलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास भविष्यातील शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून या अनधिकृत शाळांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. शहरातील शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अनाधिकृत खाजगी प्राथमिक शाळांविरोधात मोठी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र लोकधारा न्यूजचे संपादक महावीर जाधव यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात अनेक खाजगी प्राथमिक शाळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता अनधिकृतरित्या सुरू असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी संबंधित शाळांना प्रशासनामार्फत नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या शाळा सुरूच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे:
ब्लोमिंग बर्ड्स, ताथवडे (इंग्रजी माध्यम)
लिटील स्टार इंग्लिश मिडीयम, चिंचवडेनगर (इंग्रजी माध्यम)
माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी (इंग्रजी माध्यम)
डी.एम.के. इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी (इंग्रजी माध्यम)
माने इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी (इंग्रजी माध्यम)
नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळेवाडी/च-होळी परिसर (इंग्रजी माध्यम)
माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, च-होळी परिसर (इंग्रजी माध्यम)
हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड (इंग्रजी माध्यम)
कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, च-होळी फाटा (इंग्रजी माध्यम)
गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, मोशी (इंग्रजी माध्यम)
या प्रकरणामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पत्रकार महावीर जाधव यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर आला असून, प्रशासनाला कारवाईस भाग पाडले असल्याची चर्चा सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा