| सांगावा न्यूज | उदगीर, दिनांक १३ : येत्या दि. १८ व १९ एप्रिल रोजी उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या अधिवेशनासाठी उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
उदगीर येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात हे अधिवेशन पार पडणार आहे. दोन दिवशीय अधिवेशनात अनेक विषयावर परिसंवाद होणार आहेत. महाराष्ट्रभरातून अनेक नामवंत पत्रकार व युवा राजकीय नेते या परिसंवादात सहभागी होणार आहेत. या अधिवेशनासाठी स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात भव्य दिव्य असे सभामंडप उभारण्यात येत आहे.
यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेचे विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, उदगीर शाखेचे अध्यक्ष युवराज धोतरे, अधिवेशन समन्वयक ज्योती स्वामी, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, ज्येष्ठ पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी, सुनील हवा, रविंद्र हसरगुंडे, सिद्धार्थ सूर्यवंशी, हणमंत केंद्रे, नागनाथ गुटे, रसूल पठाण, रामदास केदार, संदीप निडवदे, अर्जुन जाधव, अनिल जाधव, विक्रम हलकीकर, विश्वनाथ गायकवाड, माधव रोडगे, मंगेश सूर्यवंशी यांच्यासह पत्रकार, स्वामी विवेकानंद संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा