Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्षाच्या  मुलाने महिला पत्रकाराला दिली धमकी; एनसीआर नोंद, पत्रकारांवरील व लोकतंत्र्यावरील दबावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर


| सांगावा न्यूज | मावळ, दिनांक २३/४/२०२६ इंदोरी : मावळ तालुक्यातील इंदोरी परिसरात महिला पत्रकाराला फोनद्वारे अप्रत्यक्षरीत्या धमकी दिल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात असंज्ञेय गुन्हा (एनसीआर) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रेखा बाळू भेगडे या तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असून स्थानिक स्तरावर पत्रकारिता करतात. इंदोरी येथे 13 एप्रिल 2026 रोजी झालेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात वर्गणी संकलनाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाचे त्यांनी त्यांच्या सतर्क महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलवर 15 एप्रिल 2026 रोजी वृत्तांकन केले होते. या बातमीमुळे काही घटक नाराज झाल्याचे समोर आले आहे.

तक्रारीनुसार, या वृत्तांकनानंतर आरोपी ऋषी विठ्ठलराव शिंदे (रा. इंदोरी, ता. मावळ) याने थेट संपर्क न साधता तक्रारदारांच्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत धमकीचा संदेश पोहोचवला. गावच्या भानगडीत पडू नको, नाहीतर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देत, संबंधित पत्रकाराला समज देण्यास सांगण्यात आले. याशिवाय, भविष्यात अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्यास गावात फिरू देणार नाही, असेही वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, याआधी एका पत्रकाराला दिलेल्या धाकाचे उदाहरणे देत पत्रकारिता करू देणार नाही, अशी धमकी देण्यात आली होती. या प्रकारामुळे संबंधित महिला पत्रकार व त्यांच्या माध्यमाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

घटनेची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 351(4) अंतर्गत एनसीआर नोंदवला आहे. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ८.१७ वाजता ही माहिती पोलीस ठाण्यात प्राप्त झाली असून, तत्काळ जनरल डायरीत नोंद करण्यात आली.

दरम्यान, या घटनेमुळे मावळ तालुक्यातील पत्रकारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्थानिक स्तरावर सत्य घटनांचे वृत्तांकन करताना दबाव टाकण्याचे प्रकार वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अशा धमक्यांमुळे मुक्त व निर्भय पत्रकारितेवर गदा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पुढील कायदेशीर कारवाईबाबत संकेत दिले असल्याची माहिती सबंधित महिला पत्रकाराने माध्यमांना दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा