Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, ११ मे, २०२६

विविध पुरस्कारांनी मान्यवरांना सन्मानित करून काव्यमित्र प्रकाशित "आनंदाचा बटवा" काव्य संग्रह आणि "आय एम द बेस्ट" कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न

 

राष्ट्रीय युवाचेतना - कवी ग्रेस स्मृती - डॉ.ना.य.डोळे स्मृति पुरस्कारांनी मान्यवरांचा केला गौरव 

पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सागर गोपाळ सूर्यवंशी यांचा राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार देऊन काव्य मित्रने केला गौरव 

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ११ मे २०२६ : काव्यमित्र संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती कवी ग्रेस स्मृतीदिन व डॉ ना य डोळे सर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून कवी संजय होणकलस यांचा "आनंदाचा बटवा" व बापू केंगले यांचा "आय एम द बेस्ट" या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा चिंचवड येथील सायन्स पार्क तारांगण सभागृह येथे पार पडला. अशा भव्य दिव्य पुस्तक प्रकाशनावेळी काव्य मित्र संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा सन्मान राष्ट्रीय पुरस्कार देऊन केला जातो त्याप्रमाणे यावर्षी या कार्यक्रमा दरम्यान हभप पुष्कर महाराज गोसावी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष व पत्रकार सागर सूर्यवंशी तसेच संभाजीनगरचे आर.टी.ओ इन्स्पेक्टर किरण बनसोडे यांना राष्ट्रीय युवाचेतना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तम माने व प्रकाश गायकवाड यांना कवी ग्रेस स्मृती पुरस्कार, शिवाजी नायकवडी, पुष्पक कांदळकर, डॉ वंदना पाटील व सुनील कांबळे यांना डॉ.ना.य.डोळे स्मृति पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

साहित्य निर्मितीतूनच समाज परिवर्तन होण्यासाठी मदत होते असे मत संत एकनाथ महाराज यांचे वंशज ह भ प डॉ पुष्कर महाराज गोसावी यांनी पुरस्कार्थींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास डॉ विजयकुमार पाटील (सेवाभावी उद्योजक) डॉ वी.पी पवार (प्राचार्य महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर) प्रसिद्ध हस्तलिखितकार अजितकुमार जमदाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामान्य नागरिक, लेखक, कवी, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक वर्ग आणि पुरस्कार्थी सहकुटुंब उपस्थित होते. सदर कार्यक्रमात अंध कवी शुभम नरवडे व अंकिता कसबे यांनी देशभक्तीपर व आई वडील विषयांवरील कविता सादर करून रंगत आणली. दरम्यान निमंत्रक कवींचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रमुख अतिथी मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या गाथा आणि भारतीय संविधान हे ग्रंथ पूजन करून दीपप्रज्वलन केले. विचार मंचावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन काव्य मित्रचे अध्यक्ष- राजेंद्र सगर, उपाध्यक्ष- डॉ. संजय जगताप, सचिव- हरिनाथ कांबळे, पुणे जिल्हा समन्वयक- संभाजी दंतराव, मराठवाडा समन्वयक- तुकाराम गुंठे आणि काव्य मित्रचे सर्व सदस्य पदाधिकारी यांनी केले. प्रसिद्ध कवी किरण तारळेकर, गरूडझेप फाउंडेशनचे गणेश गरुड, व्याख्याते राहुल चव्हाण, डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विनय सोनवणे, उपाध्यक्ष पत्रकार संतोष गोतावळे, माजी अध्यक्ष पत्रकार महावीर जाधव, पत्रकार विजय न्यायाधीश यांच्या सह इतर मान्यवर व प्रेक्षक उपस्थित होते. दरम्यान अध्यक्षीय मनोगत ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी भापकर यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया जोगदंड यांनी केले. तर राजेंद्र सगर यांनी आभार व्यक्त केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा