Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

सोमवार, ८ जून, २०२६

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे वर्चस्व; १४ उमेदवारांचा विजय


मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलची दमदार कामगिरी ; पुन्हा महामंडळाचा कारभार हाती

| सांगावा न्यूज | कोल्हापूर, दिनांक ८ जून २०२६ : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने दमदार कामगिरी करत बहुमत मिळवले आहे. पॅनेलकडून निवडणूक मैदानात उतरलेल्या उमेदवारांपैकी १४ जणांनी विजय संपादन करत आपले वर्चस्व सिद्ध केले.

समर्थ पॅनेलमधून मेघराजराजे भोसले, सुनील महाजन, दीपक कदम, अजित शिरोळे, राज काजी, सुशांत शेलार, धनाजी यमकर, सुभाष नकाशे, शरद चव्हाण, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे आणि विकास तोरणे यांच्यासह एकूण १४ उमेदवार विजयी झाले. या निकालामुळे चित्रपट क्षेत्रातील संघटनात्मक राजकारणात समर्थ पॅनेलची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, महामंडळातील तीन पदांसाठी निवडणूक घेण्याची आवश्यकता भासली नाही. अभिनेत्री प्रतिनिधी पदासाठी वर्षा उसगावकर, संकलन विभागातून विजय खोचीकर आणि संगीत व पार्श्वगायन विभागातून आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. मात्र, निवडणूक प्रक्रिया वादविरहित राहिली नाही. अभिनेते विजय पाटकर यांनी काही व्यक्तींनी राजकीय हस्तक्षेप करून आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करू दिला नसल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या विधानामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली. परंतु पाटकर यांचा आरोप निराधार आणि बिन बुडाचा ठरला! याशिवाय, नीलम शिर्के यांच्या उमेदवारीबाबतही काही काळ चर्चेला उधाण आले होते. तथापि, अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर नीलम शिर्के यांनी माघार घेत असल्याचे अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर केले. त्यामुळे या विषयावर सुरू असलेल्या चर्चांना काही प्रमाणात विराम मिळाला.

निवडणुकीच्या निकालानंतर समर्थ पॅनेलच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात महामंडळाच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुन्हा एकदा समर्थ पॅनेलने मिळविलेले दणदणीत यश हे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिणाम असल्याच्या भावना कलाकारांनी बोलून दाखविल्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा