| सांगावा न्यूज | पुणे, दिनांक १६ जून २०२६ : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लागू असलेले समांतर आरक्षण रद्द करून, केंद्र सरकारच्या कायद्यानुसार स्वतंत्र ५% आरक्षण लागू करावे, या मुख्य मागणीसाठी सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या कार्यालयाबाहेर राज्यस्तरीय तीव्र आंदोलन आणि अन्नत्याग उपोषण करण्यात सुरू केले आहे. दिव्यांग विद्यार्थी प्रतिनिधी गौरव मालक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असून, यामध्ये राज्यभरातून हजारो दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी आले आहेत.
मुख्य अडचणी आणि मागण्या:
सध्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'समांतर आरक्षण' पद्धत लागू आहे. या पद्धतीमुळे प्रत्येक प्रवर्गातील अत्यंत मर्यादित जागांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. परिणामी, अनेक गरजू आणि पात्र दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृहाच्या प्रवेशापासून वंचित राहत असून, त्यांना शिक्षण घेताना मोठ्या आर्थिक व मानसिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समांतर आरक्षणामुळे राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे.
केंद्र शासनाच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी:
केंद्र शासनाच्या 'दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६' मधील कायदेशीर तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र ५ % आरक्षणाची स्पष्ट व्यवस्था करण्यात आलेली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागानेही आपल्या वसतिगृहांमध्ये समांतर आरक्षणाची जाचक अट रद्द करून, स्वतंत्र ५ % दिव्यांग आरक्षण तात्काळ लागू करावं ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
या न्याय हक्कासाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रशासनाने तात्काळ आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी गौरव मालक स्वतः अन्नत्याग उपोषण करीत असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
तसेच या संदर्भातील सविस्तर मागण्यांचे निवेदन आणि प्रशासनाला यापूर्वी करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांना दिली गेली आहे.
-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)संपादक, सांगावा न्यूज
_________________________________________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा