अशोका सोसायटी, थेरगाव येथे देवतांच्या फोटो-मूर्तींची विधिवत पूजा करून विसर्जित ; कचरायुक्त परिसराची स्वच्छता
| सांगावा न्यूज | थेरगाव, दिनांक ५ : अशोका सोसायटी परिसरातील चौकात असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती बांधलेल्या कट्ट्यावर काही देवी-देवतांचे फोटो, तुटलेल्या फोटोफ्रेम तसेच मूर्ती बेवारस अवस्थेत टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. याच ठिकाणी कचरा, अवशेष आणि अस्वच्छता साचल्याने परिसराचे विद्रूपीकरण होत असून नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ. योगिता बारणे यांनी तत्काळ प्रशासनाला सूचना देऊन, कर्मचाऱ्यांकडून फोटो फ्रेम आणि मूर्तीची विधिवत पूजा करून तसेच तेथे साठलेला कचरा काढून परिसर स्वच्छ व सुंदर केला.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ग प्रभागातील संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सदर परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कट्ट्यावर आणि परिसरात टाकण्यात आलेल्या तुटलेल्या देवी-देवतांच्या फोटोफ्रेम व मूर्तींची विधिवत पूजा करून त्यांचे योग्य प्रकारे विसर्जन करण्यात आले. तसेच नागरिकांनी घरातील तुटलेल्या मूर्ती, फोटोफ्रेम किंवा धार्मिक साहित्य सार्वजनिक ठिकाणी अथवा बेवारसपणे टाकू नये, असे आवाहन करण्यात आले. नगरसेविका सौ. योगिताताई बारणे यांच्या सहकार्याने संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमामुळे पिंपळाच्या झाडाभोवतीचा कट्टा आणि परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुशोभित झाला असून नागरिकांकडून या कार्याचे स्वागत करण्यात येत आहे. धार्मिक स्थळे व सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी जबाबदारीची जाणीव ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)संपादक, सांगावा न्यूज
_________________________________________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा