Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, ५ जून, २०२६

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी उपस्थित राहणार____ सतीश काळे


दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा

| सांगावा न्यूज | पिंपरी चिंचवड, दिनांक ५ : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देणारा भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा यंदा दि. ५ व ६ जून रोजी दुर्गराज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या लोकोत्सवाला समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे  व जिल्हाध्यक्ष गणेश दहिभाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. पिंपरी चिंचवड शहरातून हजारो शिवप्रेमी रायगडावर पोहचणार आहेत.

६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य सार्वभौम सत्तेच्या रूपाने जगासमोर उभे राहिले. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. यंदाच्या सोहळ्यात 'धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची' 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा' आणि 'सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा' हे विशेष कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. शुक्रवार दि. ५ जून रोजी दुपारी राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या समाधीस अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवप्रेमींसह नाणे दरवाजामार्गे गड चढाई केली जाणार आहे. नगारखाण्यात गडपूजन झाल्यानंतर होळीच्या माळावर पारंपारिक युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जातील. सायंकाळी ढोल- लेझीम वारकरी संप्रदायाचा टाळ-मृदंग गजर, राजसद्रेवरील शिवशाहीरांचा जागर, शिरकाई देवीचा गोंधळ तसेच जगदीश्वर मंदिरात किर्तन भजनाचे कार्यक्रम होणार आहेत, शनिवार दि. ६ जून रोजी सकाळी ध्वजारोहणाने मुख्य सोहळ्याला प्रारंभ होईल. त्यानंतर शाहिरी कार्यक्रम, शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे राजसदरेवर आगमन आणि राज्याभिषेकाचा मुख्य विधी पार पडणार आहे. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सवमूर्तीला अभिषेक तसेच सिंहासनारूढ मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात येणार आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले आहे.

-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)संपादक, सांगावा न्यूज
_________________________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा