Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, ५ जून, २०२६

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अत्यंत आवश्यक__नगरसेवक सुरेश भोईर


जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिंचवडगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

| सांगावा न्यूज | पिंपरी, दि. ४ जून २०२६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १८, चिंचवडगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, नगरसेविका अपर्णाताई डोके तसेच नगरसेविका मनीषाताई चिंचवडे यांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाच्या चिंचवड-काळेवाडी मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट. हर्षद नढे, सरचिटणीस मधुकर बच्चे, भाजपा उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, डॉ. अजित जगताप, लक्ष्मण माहुरे, प्रसाद परब, महेश भोईर, हरिभाऊ मोहिते, सुभाष पंडित, मधुकर कुलकर्णी, अमेय देशपांडे, महानंदा भोईर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे नाळे साहेब, कांबळे साहेब आणि इतर अधिकारी-कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनीही उपस्थित राहून वृक्षसंवर्धनासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी बोलताना नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि तापमानवाढ यावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने झाडे लावून त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या वृक्षारोपण उपक्रमामुळे परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून नागरिकांनीही अशा उपक्रमांचे स्वागत केले.

-------------------SANGAVA NEWS-------------------
Official Contact Number : 8263083329
Email : sangavanews19@gmail.com
विनय सोनवणे (MJMC)संपादक, सांगावा न्यूज
_________________________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा