Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

शुक्रवार, २६ जून, २०२६

भोसरीत 'गाव तिथे व्यसनमुक्ती' अभियानाला प्रारंभ; होप व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रथम शाखेचे उद्घाटन


| सांगावा| भोसरी, दिनांक २६ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी सप्ताहाच्या समारोपानिमित्त भोसरी येथे 'गाव तिथे व्यसनमुक्ती' या उपक्रमांतर्गत होप व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रथम शाखेचे उद्घाटन व बोर्ड अनावरण समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम दि. १७ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. विजय मोरे व प्रा. सुनिता मोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. रविभाऊ लांडगे (महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) यांच्या हस्ते झाले. यावेळी मा. श्रीमती मीना आंबाडेकर (सहाय्यक आयुक्त, व्यसनमुक्ती कार्य, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे), मा. श्री. राधाकिसन देवढे (जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे), मा. श्री. सुरेशभाऊ लांडगे (सामाजिक कार्यकर्ते), मा. श्री. रोहन गायकवाड (समाजकल्याण निरीक्षक) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात प्रा. दिगंबर ढोकले यांनी प्रमुख वक्ते म्हणून व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी जनजागृती, युवकांची भूमिका आणि कुटुंबाच्या सहभागाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "गाव तिथे व्यसनमुक्ती" हा उपक्रम प्रत्येक गावात व्यसनमुक्तीची चळवळ उभी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम पुणे-नाशिक रोड, महाराष्ट्र हॉटेल शेजारी, चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे येथे संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा