Logo

Sangava News

Right To Express
RNI NO.MAHMAR/2024/89916
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8263083329 Follow करा, सामान्य माणसांचा निर्भिड आवाज ' सांगावा न्युज ' पुणे, पिंपरी चिंचवड आणि धाराशिव जिल्ह्यात ' सांगावा न्युज ' साठी पत्रकार पाहिजेत. अट पदवीधर असणे आवश्यक. Resume ईमेल करा sangavanews19@gmail.com सांगावा न्युज : संपादक - विनय सोनवणे ( संपर्क : 8263083329 )
Videos Pimpri-Chinchwad Pune Dharashiv Maharashtra State National Sports Entertainment Cricket

मंगळवार, ३० जून, २०२६

बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा पल्स पोलिओ मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग


| सांगावा न्यूज | रविवारी दिनांक २८ जून रोजी बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातील स्वयंसेवकांनी शासनाच्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून समाजसेवेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. या मोहिमेदरम्यान स्वयंसेवकांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पिंपरी चिंचवड येथील विविध पोलिओ लसीकरण केंद्रांवर कार्य करत लहान बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याच्या उपक्रमात मोलाची मदत केली. तसेच पालकांमध्ये पोलिओ निर्मूलनाबाबत जनजागृती करून प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचा मूलमंत्र "Not Me, But You" (स्वतःपेक्षा समाज प्रथम) याची प्रचिती स्वयंसेवकांनी आपल्या सेवाभावी वृत्तीमधून घडवून आणली. समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी आणि पोलिओमुक्त भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी दिलेले योगदान अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांच्या सामाजिक बांधिलकीची ही प्रेरणादायी जाणीव आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर जांभुळकर डॉ. नागेश भंडारी, प्रा.अनुपमा कदम व प्रा. सद्दामहुसेन घाटवाले यांनी कार्यक्रम यशस्वी केले आणि भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे दृढ निश्चित केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा