| सांगावा न्यूज | मुळशी, दिनांक १८ जुलै २०२६ : अयोध्या येथील श्रीराम मंदिरात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच संलग्न संघटनांच्या वतीने ‘राम रक्षा आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. राम मंदिर हे श्रद्धेचे प्रतीक असून त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या आंदोलनातून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. "राम मंदिर हे श्रद्धेचे प्रतीक आहे, अशा श्रदस्थळी दान दिलेली रोख रक्कम व इतर वस्तूंची चोरी म्हणजे आमच्या श्रद्धेची चोरी आहे, भावनेची भक्तीची चोरी आहे.
राम मंदिरात भ्रष्टाचार हा असह्य आहे. रामाचा अपमान आम्हाला मान्य नाही!" असा संदेश देण्यात येणार असून, आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता हे आंदोलन माणादेवी मंदिर, माणगाव चौक (तालुका मुळशी) येथे होणार आहे.
या आंदोलनाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवा सेना, महिला आघाडी तसेच मुळशी तालुक्यातील संलग्न संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. श्रद्धास्थानांच्या पावित्र्याचा सन्मान राखण्यासाठी आणि कथित गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन असे आवाहन करून युवा सेनेचे नागेश साखरे यांनी माध्यमांना माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा